AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir | राम मंदिरातील दानाचा हिशोब जाहीर करा... राहुल-खर्गेंची पंतप्रधान मोदींना मोठी मागणी

Ram Mandir | राम मंदिरातील दानाचा हिशोब जाहीर करा… राहुल-खर्गेंची पंतप्रधान मोदींना मोठी मागणी

| Updated on: Jul 19, 2026 | 12:30 PM
Share

अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान गैरव्यवहार प्रकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर दबाव वाढवला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात राम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता ठेवण्याची मागणी केली आहे. मंदिरात जमा झालेल्या रोख रक्कम, सोने, चांदी आणि इतर सर्व देणग्यांचा संपूर्ण हिशोब सार्वजनिक करण्यात यावा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच, कथित दान गैरव्यवहार प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रातून म्हटले आहे.

दरम्यान, राम मंदिरातील कथित दान गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणावर केंद्र सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 19, 2026 12:30 PM

Follow Us