AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव मंदिर, जेथे बदलतो शिवलिंगाचा रंग, या ‘बेडूक मंदिरा’तील नंदीचे महत्त्व काय?

भारतात असंख्य मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराचे महत्त्व देखील वेगळे आहे. असेच एक मंदिर आहे जेथील शिवलिंगाचा रंग बंदलतो. विशेष म्हणजे मंदिराचं नाव बेडूक मंदिर असं आहे... तर मंदिरातील नंदीचे महत्त्व देखील खास आहे.

भारतातील एकमेव मंदिर, जेथे बदलतो शिवलिंगाचा रंग, या 'बेडूक मंदिरा'तील नंदीचे महत्त्व काय?
| Updated on: Jul 19, 2026 | 2:06 PM
Share

हिंदू धर्मात पूजा पाठ यांसारख्या धार्मिक गोष्टींना फार मोठं महत्त्व आहे. एवढंच नाही तर, हिंदू धर्मात प्राणी आणि पक्ष्यांना विशेष स्थान आहे. गाय, नाग, हत्ती, सिंह यांसारख्या अनेक प्राण्यांना दैवी रूपे मानून त्यांची पूजा केली जाते. मात्र, बेडकाला मुख्य प्रतीक मानून बांधलेल्या शिव मंदिराविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. या मंदिराचं देखील खास महत्त्व आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील ओएल गावात असलेले हे दुर्मिळ मंदिर ‘मंडूक मंदिर’ किंवा ‘बेडूक मंदिर’ म्हणून ओळखले जाते. भारतातील या प्रकारच्या रचनेसाठी प्रसिद्ध असलेले हे एकमेव मंदिर म्हणून ओळखले जाते.

बेडकाच्या आकाराचे एक चमत्कारिक मंदिर

या मंदिराची अनोखी स्थापत्यशैली पर्यटकांना लगेचच प्रभावित करते. मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त, पर्यटक मंदिराला भेट देतात. बाहेरून पाहिल्यास, संपूर्ण मंदिर एका विशाल बेडकाच्या आकाराचे दिसते. वास्तुशास्त्रानुसार, हे मंदिर एका महाकाय मगरीच्या पाठीवर बसलेल्या बेडकाच्या आकारात बांधले आहे.

स्थानिक मान्यतेनुसार, तांत्रिक परंपरेतील एक महान व्यक्तिमत्व मानल्या जाणाऱ्या कपिल यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘मंडुका यंत्रा’च्या तत्त्वांवर आधारित हे मंदिर राजस्थानी शैलीत बांधले गेले. मंदिराची रचना अशा प्रकारे केली आहे की, जर भाविक पूर्वेकडील दरवाज्यातून आत शिरले, तर ते थेट गर्भगृहात पोहोचू शकतात. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर कोरलेली तांत्रिक शिल्पे त्याच्या वैशिष्ट्यात आणखी भर घालतात.

रंग बदलणारे शिवलिंग.. उभा नंदी

या मंदिरात स्थापित भगवान नर्मदेश्वर महादेवांचे शिवलिंग सर्वात अद्वितीय मानले जाते. नर्मदा नदीतून आणलेले हे दुर्मिळ शिवलिंग, प्रकाशाच्या प्रभावानुसार दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी आपला रंग बदलते, असे भक्तांचे म्हणणे आहे. याच वैशिष्ट्यामुळे देशभरातून भक्त येथे येतात.

मंदिरातील नंदीची मूर्ती

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, सहसा शिव मंदिरांमध्ये नंदीची मूर्ती बसलेल्या अवस्थेत असते. पण या मंदिरात नंदी उभ्या अवस्थेत दिसतो. असे म्हटले जाते की, अशा स्वरूपातील नंदीच्या मूर्तीचे अस्तित्व अत्यंत दुर्मिळ आहे. स्थानिकांच्या मते, एकेकाळी मंदिराच्या शिखरावरील छत्री सूर्यकिरणांच्या दिशेने फिरायची. आता काळाच्या ओघात तिची दुरवस्था झाली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...