Chanakya Niti : आयुष्यात या गोष्टींना कधीच घाबरू नका, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टींचा तुम्हाला निर्भिडपणे सामना करावाच लागेल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर अशा काही गोष्टी असतात, ज्यांचा सामना हा तुम्हाला न भीती करावाच लागतो. जर तुम्ही या गोष्टींना भीलात आणि मागे सरकलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? आणि या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्दल.
कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाशिवाय पर्याय नाही, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कष्ट हे करावेच लागणार आहेत. तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढं जास्त यश तुम्हाला मिळणार आहे. कष्ट केले तचर तुमचं भविष्य उज्वल असणार आहे, त्यामुळे कधीही कष्टाला घाबरू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
सत्य – चाणक्य म्हणतात सत्याला कधीही मरणं नसतं, ते कधी न कधी तरी समोर येणार आहे, त्यामुळे नेहमी सत्याचा सामना करा, जे सत्य आहे, ते स्विकारला. जर तुम्ही सत्य स्विकारलं तर तुम्ही त्या परिस्थितीमधून लवकर बाहेर पडू शकता. परंतु तुम्ही जर सत्याचा स्विकार केला नाही तर मात्र तुम्ही त्या परिस्थितीमध्ये अडकून पडता त्यामुळेच माणसाने कधीही सत्याला घाबरू नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
संयम ठेवा – त्याच बरोबर माणसाने संयम ठेवावा असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य म्हणतात जर तुम्ही संयम ठेवला तर जगातील कोणतीच ताकद तुमचा कधीही पराभव करू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात संमय अतिशय महत्त्वाचा असतो, असा सल्ला चाणक्य यांनी दिला .
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
