AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : फेल प्रोडक्टला किती वेळा लॉन्च करणार, नरेंद्र मोदींनी काँग्रेसला खिजवलं, राहुल गांधीवर हल्लाबोल!

आपले अपयश झाकण्यासाठी काँग्रेस देशाची प्रगती, देशाच्या चांगल्या गोष्टींवर शंका उपस्थित करत आहे. गांधी कुटुंब काँग्रेससाठी एक ओझं झालं आहे, असा हल्लाबोल मोदी यांनी केला.

Narendra Modi : फेल प्रोडक्टला किती वेळा लॉन्च करणार, नरेंद्र मोदींनी काँग्रेसला खिजवलं, राहुल गांधीवर हल्लाबोल!
narendra modi and rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 10:12 PM
Share

Narendra Modi On Rahul Gandhi : गेल्या काही दिवसांपासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले आहेत. एसआयआर, तसेच निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवरून त्यांनी सत्ताधारी भाजपाला घेरले आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा ध्यावा अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीनंतर काँग्रेसने देशभरात मोठे आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या याच घडामोडींचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तसेच राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केलीय. मोदी यांनी ‘फेल प्रोडक्ट’ म्हणत राहुल गांधी यांना त्यांचे नाव न घेता हिणवले आहे.

काँग्रेस आपल्या फेल प्रोडक्टला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या धोरणामुळे विरोधी पक्षातील इतर नेत्यांना आणि सरकारवर प्रामाणिकपणे टीका करू इच्छिणाऱ्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळत नाही, असा आरोपही मोदी यांनी केला. ‘काँग्रेस आपल्या फेल प्रोडक्टला लॉन्च करण्यासाठी आणखी किती दिवस देशाला धोक्यात टाकेल काय माहिती. वर्षभरात आपण श्रीहरीकोटा येथून जेवढे रॉकेट लॉन्च करत नाहीत, त्यापेक्षा जास्त वेळा काँग्रेसचे लोक आपल्या नेत्याला लॉन्च करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात,’ अशी उपरोधिक टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

मोदी यांचा गांधी कुटुंबावर हल्लाबोल

आपले अपयश झाकण्यासाठी काँग्रेस देशाची प्रगती, देशाच्या चांगल्या गोष्टींवर शंका उपस्थित करत आहे. गांधी कुटुंब काँग्रेससाठी एक ओझं झालं आहे, असा हल्लाबोल मोदी यांनी केला. काँग्रेस पार्टीतील इतर नेत्यांनाही याची कल्पना आहे. हे नेते जेव्हा माझ्याशी चर्चा करतात तेव्हा ते याबाबत सांगतात, असा दावाही मोदी यांनी केला. विरोधी बाकावरील काही नेत्यांना देशाचे भले व्हावे असे वाटते. परंतु काँग्रेसच्या गोंगाटामुळे या नेत्यांच्या संधी मिळत नाही, असेही मोदी म्हणाले. दरम्यान, आता यावर काँग्रेस नेमकी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ