AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC | कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल

KDMC | कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल

| Updated on: Jul 19, 2026 | 1:51 PM
Share

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) 100 टक्के नालेसफाईच्या दाव्याची प्रत्यक्षात पोलखोल झाल्याचे चित्र समोर आले आहे. गोविंदवाडी रोड परिसरातील मुख्य नाल्याची दयनीय अवस्था पाहता, महापालिकेच्या दाव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गोविंदवाडी रोड परिसरातील हा नाला पश्चिम भागातील प्रमुख नाल्यांपैकी एक आहे. मात्र, नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक आणि जलपर्णी साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह जवळपास पूर्णपणे बंद झाला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) 100 टक्के नालेसफाईच्या दाव्याची प्रत्यक्षात पोलखोल झाल्याचे चित्र समोर आले आहे. गोविंदवाडी रोड परिसरातील मुख्य नाल्याची दयनीय अवस्था पाहता, महापालिकेच्या दाव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गोविंदवाडी रोड परिसरातील हा नाला पश्चिम भागातील प्रमुख नाल्यांपैकी एक आहे. मात्र, नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक आणि जलपर्णी साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह जवळपास पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याचा आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दरम्यान, पावसाळ्यापूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून 100 टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पावसाळा सुरू होऊन जवळपास एक महिना उलटूनही गोविंदवाडी रोड परिसरातील नाल्याची साफसफाई झालेली नसल्याचे प्रत्यक्ष चित्रातून दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या दाव्यावर नाराजी व्यक्त करत तातडीने नाल्याची सफाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, KDMC च्या 100 टक्के नालेसफाईच्या दाव्याची प्रत्यक्षात पोलखोल झाल्याची चर्चा सुरू असून, याप्रकरणी महापालिकेची भूमिका काय असणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 19, 2026 01:51 PM

Follow Us
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, थेट हायकोर्टात धाव, रक्त तपासणी...

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, थेट हायकोर्टात धाव, रक्त तपासणी..

अंधार पडताच निर्वस्त्र मंदिरात गेली… त्यानंतर मूर्ती उचलून थेट तलावात उडी; त्या प्रकरणात नवा ट्विस्ट.

अंधार पडताच निर्वस्त्र मंदिरात गेली… त्यानंतर मूर्ती उचलून थेट तलावात उडी; त्या प्रकरणात नवा ट्विस्ट

मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं.

मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं

IND vs ENG: टीम इंडियासोबत हॉटेलपर्यंत आला पण नंतर गायब, मॅचपूर्वीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल.

IND vs ENG: टीम इंडियासोबत हॉटेलपर्यंत आला पण नंतर गायब, मॅचपूर्वीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल

जेनिफर विंगेटचं वयाच्या 41 व्या वर्षी दुसरं लग्न; कोण आहे पती विलियम इश्माइल?.

जेनिफर विंगेटचं वयाच्या 41 व्या वर्षी दुसरं लग्न; कोण आहे पती विलियम इश्माइल?

सलमान खानची प्रकृती खालावली? व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत, थेट धर्मेंद्र यांच्यासारखीच...

सलमान खानची प्रकृती खालावली? व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत, थेट धर्मेंद्र यांच्यासारखीच..