AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bfची हत्या केली, मृतदेह गोणीत भरून बाथरुमचा नळ चालू ठेवला, पण एका व्हॉइस मेसेजने गेम केला

कल्याण येथून एक धक्कादायक प्रकरण उघड समोर आले आहे. एका महिलेने थेट बॉयफ्रेंडची हत्या करुन मृतदेह गोणीत भरला. त्यानंतर ती गोण बाथरुममध्ये ठेवून नळ सुरु ठेवला. पण त्या महिलेच्या एका व्हॉइस नोटने संपूर्ण प्रकरण उघड झाले आहे.

Bfची हत्या केली, मृतदेह गोणीत भरून बाथरुमचा नळ चालू ठेवला, पण एका व्हॉइस मेसेजने गेम केला
Kalyan CrimeImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 6:11 PM
Share

कल्याण येथे एक अत्यंत भयानक हत्या प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात 37 वर्षीय एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून भाड्याच्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये लपवण्यात आला. त्यानंतर महिलेने बाथरुमचा नळ चालू ठेवला जेणेकरुन मृतदेह लवकर सडून जाईल. त्या महिलेने इतर पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं?

ही घटना कल्याणच्या मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीतील आहे. गेल्या काही दिवसांपासून सोसायटीतील रहिवाशांना एका फ्लॅटमधून दुर्गंध येत होती. रहिवाशांनी याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा फ्लॅट बाहेरून बंद आढळला. पोलिसांनी दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. तपासात बाथरूममध्ये एक गोण आढळली. त्यातून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख ३७ वर्षीय हमीदुल्लाह इस्लाम अशी झाली.

धारदार शस्त्राने हत्या

पोलिसांच्या मते, मृतदेह पूर्णपणे सडला होता. त्यानंतर क्राईम ब्रँच आणि फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले. टीमने फ्लॅटमधून अनेक महत्त्वाचे नमुने गोळा केले, ज्यांची तपासणी सुरू आहे. प्राथमिक तपासात समोर आले की, हमीदुल्लाहची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली होती. हत्येनंतर शव गोणीत भरून बाथरूममध्ये लपवण्यात आला. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने जाणूनबुजून बाथरूमचा नळ चालू ठेवला होता, जेणेकरून वाहणारे पाणी रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करतील.

व्हॉइस मेसेजने मिळाला महत्त्वाचा पुरावा

या प्रकरणात सर्वात मोठे वळण तेव्हा आला जेव्हा फ्लॅट मालकाला एक व्हॉइस मेसेज मिळाला. पोलिसांच्या मते, हा मेसेज हसीबा नावाच्या महिलेचा होता. तिने कथितरित्या सांगितले की, तिने आपल्या प्रेमीची हत्या केली आहे. त्याचा शव बाथरूममध्ये आहे आणि त्याचे अंतिम संस्कार करावे. इतकेच नाही तर तिने हेही सांगितले की, बाथरूमचा नळ चालू सोडला आहे. हे मेसेज मिळताच फ्लॅट मालक तत्काळ पोलिसांकडे गेला. त्यानंतर पोलिसांनी फ्लॅटमध्ये शिरून मृतदेह ताब्यात घेतला.

हत्येनंतर प्रेयसी फरार

डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे यांच्या मते, हसीबा आणि मृत हमीदुल्लाह गेल्या अडीच महिन्यापासून या फ्लॅटमध्ये राहत होते. मात्र, या महिलेचा नवरा गेल्या दोन वर्षांपासून तिथेच राहत होता. तपासात समोर आले की, हत्येनंतर हसीबा कोलकाता येथे पळून गेली आहे. पोलिस आता हेही तपासत आहेत की, या गुन्ह्यात तिचा नवरा सहभागी तर नाही? अशी शक्यता आहे की, दोघेही एकत्र फरार झाले असावेत. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी महिलेच्या अटकेसाठी एक पोलिस टीम कोलकाता येथे पाठवण्यात आली आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष