AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Rashi Bhavishya: दसऱ्याला काही राशींना मिळणार आनंदाची बातमी; तुमच्या राशीसाठी दिवस कसा असेल? वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 20 October 2026: दसऱ्याचा दिवस काही राशींसाठी आनंद आणि नवीन संधी घेऊन येणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार मेष ते मीन राशींच्या आर्थिक स्थितीपासून करिअर आणि प्रेम जीवनापर्यंत काय बदल होऊ शकतात, जाणून घ्या आजचे राशिभविष्य.

Today Rashi Bhavishya: दसऱ्याला काही राशींना मिळणार आनंदाची बातमी; तुमच्या राशीसाठी दिवस कसा असेल? वाचा आजचं राशीभविष्य
Astrology
| Updated on: Oct 20, 2026 | 6:00 AM
Share

दसऱ्याच्या मंगलदायी वातावरणात प्रत्येकाला दिवसाची सुरुवात शुभ आणि आनंददायी व्हावी, असे वाटते. अशातच ग्रह-नक्षत्रांची स्थिती तुमच्या दिवसावर कसा प्रभाव टाकू शकते, हे जाणून घेणेही महत्त्वाचे ठरते. २० ऑक्टोबर रोजी काही राशींच्या व्यक्तींना कामात यश, आर्थिक लाभ किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. चला, जाणून घेऊया दसऱ्याच्या दिवशी मेष ते मीन या १२ राशींसाठी काय संकेत आहेत.

मेष

कामाच्या ठिकाणी पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळतील. उत्पन्नाच्या वेगवेगळ्या मार्गांतून पैसे मिळू शकतात. आरोग्य चांगले राहिल. नवीन कल्पना सुचल्यामुळे कामात प्रगती करण्यास मदत होईल.

वृषभ

कामाच्या ठिकाणी आणि घरात छोट्या-छोट्या निर्णयांमुळे सकारात्मक बदल अनुभवता येतील. इतरांशी प्रेमाने आणि संयमाने बोला. कामांचे छोटे टप्पे करून नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. घाई करण्याऐवजी संयमाने काम करणे फायदेशीर ठरेल.

मिथुन

मनात नवीन कल्पना येऊ शकतात. इतरांशी चर्चा करून आपल्या कल्पना मांडल्यास चांगल्या सूचना मिळू शकतात. दैनंदिन जीवनात काही छोटे बदल करण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीतही दिवस सकारात्मक ठरू शकतो.

कर्क

कामावर लक्ष केंद्रित करून योग्य नियोजन करावे. रखडलेली कामे पूर्ण करण्यास मदत होईल. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने संवाद साधल्यास घरातील वातावरण शांत राहील. आर्थिक व्यवहार करताना खर्चावर नियंत्रण ठेवा. बचत करण्याला प्राधान्य द्या.

सिंह

मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत आपल्या कल्पना शेअर करा. एखाद्या छोट्या चर्चेतून कामासाठी उपयुक्त योजना तयार होऊ शकते. दैनंदिन जीवनातील एखादी सवय बदलण्याचा प्रयत्न केल्यास फायदा होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.

कन्या

दैनंदिन कामांचे नियोजन व्यवस्थित ठेवा. आज घेतलेले एखादे महत्त्वाचे पाऊल भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नवीन लोकांशी संपर्क वाढवण्याची संधी मिळेल. तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची कामाच्या ठिकाणी दखल घेतली जाईल.

तूळ

इतरांशी मतभेद झाल्यास संयम राखा. नवीन अनुभव घेण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या विचारांचा विस्तार होऊ शकतो. मनात येणाऱ्या कल्पना लिहून ठेवा आणि त्यांचा विचारपूर्वक अभ्यास करा. काम करताना एकाग्रता टिकवून ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील.

वृश्चिक

मित्रांकडून सल्ला किंवा सहकार्य मिळू शकते. दैनंदिन कामे सोप्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे निर्णय घेताना व्यवहार ज्ञानाचा वापर करा. इतरांचा उपयुक्त सल्ला स्वीकारा. उत्पन्नातील काही भाग बचत करण्याचा प्रयत्न करा.

धनु

नियमितपणे आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामातून प्रगती साधता येईल. विचार करण्याची क्षमता चांगली राहिल. नवीन गोष्टी करण्याची इच्छा होईल. मोठे निर्णय घेण्यापूर्वी छोट्या कामांना प्राधान्य द्या. संयमाने पुढे गेल्यास अपेक्षित परिणाम मिळण्यास मदत होईल.

मकर

आपल्या कल्पना योग्य पद्धतीने इतरांसमोर मांडल्यास त्यांचे सहकार्य मिळू शकते. मित्र आणि सहकाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळू शकते. नवीन गोष्टी शिकून आपल्या योजनांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.

कुंभ

आपल्या विचारांना आणि कौशल्यांना महत्त्व देणाऱ्या व्यक्तींशी संपर्क वाढवा. आर्थिक लाभ होईल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. बचतीच्या नवीन पद्धती समजून घ्या. नात्यात प्रेमाने संवाद साधा. एखादे छोटे क्रिएटिव्ह काम केल्याने आनंद मिळेल.

मीन

आर्थिक स्थिती स्थिर राहिल. मित्रांसोबत वेळ घालवण्याची आणि नवीन गोष्टी अनुभवण्याची संधी मिळू शकते. आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा. आत्मविश्वास वाढवण्यावर भर द्या. छोट्या यशाचाही आनंद घ्या.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष