AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार चुका आयुष्य बरबाद करतील, दुर्लक्ष नकोच, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या की आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणूस आपल्या आयुष्यात अशा काही चुका करतो की त्याच्यावर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते.

Chanakya Niti : या चार चुका आयुष्य बरबाद करतील, दुर्लक्ष नकोच, चाणक्य काय म्हणतात?
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 20, 2026 | 9:02 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शनाचं काम करतात. माणसानं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यता सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात की माणूस आपल्या आयुष्यात अशा काही चुका करतो की, त्या चुकांना आयुष्यभर माफी मिळू शकत नाही, ती एकच संधी त्याच्याकडे असते, मात्र त्यावेळी त्याने योग्य निर्णय न घेतल्यास त्याच्यावर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते. माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. फक्त त्याचंच नाही तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यक्तींना देखील कष्ट भोगावे लागतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, आणि या चुका नेमक्या काय आहेत? त्याबद्दल.

आजचं काम उद्यावर ढकलणं – चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की आजचं काम आजच करा, आजची काम कधीही उद्यावर ढकलू नका. जर तुम्ही आजचं काम उद्यावर ढकलत असाल तर आयुष्यात तुम्ही फार मोठी चूक करत आहात, तुम्हाला त्यामुळे तुमच्या कामात कधीही यश मिळणार नाही. तसेच तुम्ही कायम जगाच्या मागे राहाल. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आजचं काम आजच करा ते काम उद्यावर ढकलण्याची चूक कधीही करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. कामं नेहमी वेळेतच पूर्ण झाली पाहाजिते असं चाणक्य म्हणतात.

शिक्षणाकडे दुर्लक्ष – चाणक्य म्हणतात शिक्षणाकडे दुर्लक्ष करणं ही एक अक्षम्य चूक आहे. जे लोक शिकण्याच्या वयात शिकत नाहीत, अशा लोकांच्या वाट्याला आयुष्यभर पश्चातापच येतो. अशा लोकांना भविष्यात चांगले रोजगाराचे साधन मिळत नाही, परिणामी त्यांची आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. असे लोक कायम जगाच्या पाठीमागेच राहतात, त्यामुळे कधीही शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

नातेसंबंध आणि मित्रांकडे दुर्लक्ष – चाणक्य म्हणतात तुमचे मित्र हेच तुमचे खरे सोबती असतात, ते तुमच्यावर संकट आलं की प्रत्येकवेळी तुमच्या मदतीला धावून येतात. तुमच्यावरचं संकट दूर करतात. तसेच नातेवाईक देखील संकट काळात तुमची मदत करतात. त्यामुळे त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. मित्र आणि नातेवाईंकाच्या कायम संर्पकात राहा, त्यातच तुमचं हीत आहे.

कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, त्यामुळे कधीही कष्ट टाळण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही आयुष्यात जेवढे जास्त कष्ट कराल तेवढी जास्त प्रगती कराल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...