AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Export : डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडावर 50 टक्के, भारतीय कंपन्यांना सोन्याचे दिवस, कसे ते जाणून घ्या..

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. जो देश आपल्या म्हणण्याच्या पुढे जातो त्याच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा टॅरिफ लावला जातो. नुकताच आता कॅनडावर मोठा टॅरिफ लावण्यात आला. याबाबतची घोषणा करण्यात आली.

Indian Export : डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडावर 50 टक्के, भारतीय कंपन्यांना सोन्याचे दिवस, कसे ते जाणून घ्या..
Canada Tariffs
| Updated on: Jul 21, 2026 | 1:36 PM
Share

Indian Export : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून मोठा टॅरिफ लावत आहेत. भारतावरही काही दिवसांपूर्वी टॅरिफ लावण्यात आला. यामध्येच इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात त्यांनी पुन्हा एकदा टॅरिफ वारला सुरूवात केली. भारतावर 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिली. यादरम्यानच कॅनडावर थेट 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. या टॅरिफच्या घोषणेने खळबळ उडाली. कॅनडावर अमेरिकेने टॅरिफ लावला असला तरीही त्यामध्ये भारताचा मोठा फायदा आहे. कॅनडाला या निर्णयाचा फटका बसेल पण भारताला फायदा होईल. कॅनडा हा अमेरिकेच्या शेजारील देश आहे, तिथे व्यापार करणे त्यांच्यासाठी कठीण आहे. भारत या संधीचा पूर्ण फायदा घेऊ शकतो.

अशी अनेक क्षेत्र आहेत जिथे भारत अमेरिकेच्या बाजारपेठेत आपली पकड अधिक मजबूत करू शकतो, ही सुवर्णसंधी आहे. अमेरिकेच्या टॅरिफचा कायमच भारताला फटका बसला आहे. पण पहिल्यांदा या टॅरिफचा फायदा भारताला होईल. दोन्ही देशात जवळपास 800 डॉलरचा व्यापार होतो. टॅरिफमुळे या व्यवहारावर परिणाम होणार. डेअरी प्रोडक्ट, स्टील, टेक्सटाईल, मशनरी आणि एल्युमिनियमचा व्यापार भारत कॅनडासोबत वाढू शकतो.

भारताची रसायनांची निर्यात सातत्याने वाढत आहे. सध्या भारत अमेरिकेला रसायनांची निर्यात करतच आहेत. आयात शुल्कामुळे कॅनडाच्या व्यापारात घट झाली तर भारतीय रासायनिक कंपन्यांना आपल्या व्यवसायाच्या संधी वाढवता येतील. एकंदरीतच काय तर अमेरिकेने कॅनडावर टॅरिफ लावला, पण त्याचा थेटपणे फायदा हा भारताला होईल. भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशात मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू केली.

भारताच्या मेडिसिनवर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात होती. अमेरिकेचे अध्यक्ष सतत भारताबद्दल धक्कादायक विधाने करताना दिसले. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर अनेक निर्बंध लावली जात आहेत. सध्या रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी सूट देण्यात आली. इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगात कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. यादरम्यान भारताच्या मदतीला धावून रशिया आला.

Follow Us
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप