AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाच्या काळात भारत तेल-गॅस संकटाचा सामना कसा करणार? PM मोदींनी संसदेत सांगितला प्लॅन

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल आणि गॅसच्या मुद्द्यावर लोकसभेत निवेदन दिले. यावेळी त्यांनी भारताची योजना काय आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली.

युद्धाच्या काळात भारत तेल-गॅस संकटाचा सामना कसा करणार? PM मोदींनी संसदेत सांगितला प्लॅन
Modi on LPGImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 23, 2026 | 3:30 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. भारतावरही या युद्धाचा परिणाम झाला आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल आणि गॅसच्या मुद्द्यावर लोकसभेत निवेदन दिले. यावेळी त्यांनी देशातील जनतेचे हित सुरक्षित राहील, असा विश्वास दिला आणि सरकार सर्व आवश्यक प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच या युद्धाचा परिणाम दीर्घकाळ राहू शकतो, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आणि संयमाने परिस्थितीचा सामना करण्याची गरज असल्याचेही म्हटले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

LPG उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण कोरोना काळात तयारीत होतो आणि त्याचा फायदा झाला. त्याचप्रमाणे आता देखील धैर्य आणि संयम ठेवून प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची गरज आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल, गॅस आणि खत होर्मुज सामुद्रधुनीमार्गे येतात. युद्धानंतर जहाजांची वाहतूक आव्हानात्मक झाली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा फारसा बाधित होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 60 टक्के एलपीजी आयात करतो. पुरवठ्यात अडचण निर्माण झाल्याने सरकारने घरगुती वापराला प्राधान्य दिले असून देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठीही उपाय योजना केल्या जात आहेत.

भारतात किती तेलसाठा?

भारतातील तेलसाठ्याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, गेल्या दशकात ऊर्जा सुरक्षिततेसाठी घेतलेली पावले आता अधिक महत्त्वाची ठरत आहेत. भारताने ऊर्जा आयात विविध देशांमधून करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी 27 देशांमधून होणारी आयात आता 41 देशांपर्यंत वाढवली आहे. भारताकडे सध्या 53 लाख मेट्रिक टन तेलसाठा आहे आणि तो 65 लाखांपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कंपन्यांकडेही वेगळे साठे आहेत. आम्ही विविध देशांशी संपर्कात असून पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. खाडी आणि आसपासच्या समुद्री मार्गांवर सरकारचे बारकाईने लक्ष आहे. जहाजांच्या सुरक्षेसाठी आम्ही तत्पर आहोत.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार तत्पर

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ‘युद्ध सुरू झाल्यापासून या भागातील भारतीयांना मदत करण्याचे काम सुरु आहे. मी संबंदित देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी बोललेलो आहे. काही लोक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आम्ही शक्य ती मदत देत आहोत. भारतीयांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. युद्धाच्या काळात 3 लाख 75 हजार भारतीय मायदेशी परतले आहे. तसेच इराणमधून 1000 लोक मायदेशी परतले आहेत. सरकार संवेदनशील आणि सतर्क आहे.’

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?