AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Gogawale | रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?

Bharat Gogawale | रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?

| Updated on: Aug 12, 2026 | 2:11 PM
Share

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी मंत्री भरत गोगावले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गोगावले यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी होणाऱ्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या बैठकीत रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भरत गोगावले हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते असून, पालकमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

वर्षावरील बैठकीत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का? याकडे आता रायगडसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 12, 2026 02:11 PM

Follow Us