AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात

कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात

| Updated on: Aug 12, 2026 | 1:00 PM
Share

सरकारकडून मोटार, कॅब आणि परमिटसंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार चालकाला मराठी भाषेचे कार्यज्ञान असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि परमिटधारकांसाठी हा महत्त्वाचा बदल मानला जात आहे.

चालकाला मराठी भाषेचे आवश्यक कार्यज्ञान नसल्याचे आढळून आल्यास त्याला ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. या मुदतीत आवश्यक निकषांची पूर्तता न केल्यास संबंधित चालकाचा परवाना तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय नियमांचे सातत्याने उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकृतता रद्द करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे चालकांना नव्या नियमांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे.

परमिटधारकांसाठीही मराठी भाषेचे कार्यज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. परमिटच्या नूतनीकरणाच्या वेळी प्राधिकरणाच्या समाधानापर्यंत मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान असल्याचे सिद्ध करणे बंधनकारक राहणार आहे.

या नव्या नियमांमुळे मोटार, कॅब चालक आणि परमिटधारकांसाठी मराठी भाषेच्या ज्ञानाला अधिकृत नियमांच्या चौकटीत महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर निलंबनापासून अधिकृतता रद्द करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते.

Published on: Aug 12, 2026 01:00 PM

Follow Us