AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक, युद्धामुळे भारतासमोर अनेक आव्हाने… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत निवेदन

PM Modi on War : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धावर चिंता व्यक्त केली आहे. या युद्धामुळे भारतासमोर मोठी आव्हाने निर्माण झाल्याचं मोदी म्हणाले.

पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक, युद्धामुळे भारतासमोर अनेक आव्हाने... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत निवेदन
Modi on WarImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 23, 2026 | 2:27 PM
Share

इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे भारतालाही मोठा फटका बसला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धावर चिंता व्यक्त केली आहे. या युद्धामुळे भारतासमोर मोठी आव्हाने निर्माण झाल्याचं मोदी म्हणाले. एस. जयशंकर आणि हरदीप पुरी यांनी याबाबतची सर्व माहिती दिली आहे. या संकटाला आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. या संकटातून लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी संपूर्ण जगाने आग्रह धरला आहे. या युद्धाने भारतासमोर अचानक समस्या निर्माण केल्या आहेत, असं मोदी म्हणाले. हे संकट लवकर संपलं पाहिजे हा संदेश या सभागृहातून जगातील सर्व देशांना गेला पाहिजे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी युद्धाच्या काळात परदेशातून भारतात सुखरूप परतलेल्या भारतीय नागरिकांवरही भाष्य केलं. प्रत्येक भारतीयाचं संरक्षण हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. तसेच युद्धाने होरपळलेल्या देशातील भारतीयांना आम्ही सातत्याने मदत करत आहोत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षावर आणि त्याचा भारतावर होणाऱ्या परिणामावर चर्चा करण्यासाठी या सभागृहात आलो आहे. तेथील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. भारतासमोर या युद्धामुळे संकट उभे राहिले आहे, हे संकट मानवीय, आर्थिक आणि सुरक्षेबाबत आहे. युद्धात सहभागी असलेल्या देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध आहेत. ज्या भागात युद्ध आहे तिथून भारताला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल मिळते. एक कोटींपेक्षा जास्त भारतीय लोक आखाती देशांमध्ये राहत आहेत. आम्ही हा संघर्ष संपवण्याचे आवाहन करत आहोत.’

3 लाख 75 हजार भारतीय मायदेशी परतले

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, ‘युद्ध सुरू झाल्यापासून या भागातील भारतीयांना मदत करण्याचे काम सुरु आहे. मी संबंदित देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी बोललेलो आहे. काहींचा मृत्यू झाला आहे, काही लोक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आम्ही शक्य ती मदत देत आहोत. भारतीयांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. युद्धाच्या काळात 3 लाख 75 हजार भारतीय मायदेशी परतले आहे. तसेच इराणमधून 1000 लोक मायदेशी परतले आहेत. सरकार संवेदनशील आणि सतर्क आहे.’

जहाजांच्या सुरक्षेसाठी सरकार तत्पर

पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, ‘भारत आपल्या गरजेचा 60 टक्के गॅस आयात करतो. भारतात मोठ्या प्रमाणात होर्मुझमधून तेलाची आणि गॅसची जहाजे येतात. भारत सरकार आखाती देशांमधून येणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे. आम्ही हार्मुझमध्ये अडकलेली अनेक जहाजे सुरक्षित भारतात आणली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये इथेनॉल च्या उत्पादनात वाढ झाली आहे, यामुळे इंधन आयातीत थोडी घट झाली आहे. आम्ही LPG चे उत्पादन वाढवले आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर नजर ठेवली जात आहे.’

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?