पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
स्वातंत्र्यदिन जवळ येत असताना देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले आहे. सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था आणि इतर संघटनांकडून तिरंगा फडकावण्यासह नागरिकांच्या सहभागातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
स्वातंत्र्यदिन जवळ येत असताना देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले आहे. सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था आणि इतर संघटनांकडून तिरंगा फडकावण्यासह नागरिकांच्या सहभागातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर विविध व्हिडीओ पोस्ट करत आहेत. या माध्यमातून ते देशातील नागरिक आणि तरुणाईला वेगवेगळे संदेश देत आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू झाले आहे. नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन मोदींनी केले आहे.
स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीसाठी संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘हर घर तिरंगा, हर मन में तिरंगा’ असा संदेश देत मोदी म्हणाले की, प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीची भावना अधिक मजबूत करूया.
Published on: Aug 11, 2026 06:02 PM
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!

