AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाटकोपरमध्ये चाळीवर दरड कोसळली, 5 जणांचा मृत्यू; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Ghatkoper Ashok Nagar Landslide: साकीनाका गौसिया चाळ परिसरात रात्रभर पडलेल्या पावसामुळे डोंगराचा काही भाग कोसळला आहे. हा भाग तेथील काही घरांवर कोसळला असल्यामुळे पाच ते सहाजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.

घाटकोपरमध्ये चाळीवर दरड कोसळली, 5 जणांचा मृत्यू; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
GhatkoparImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 12:11 PM
Share

मुंबईतील घाटकोपर येथील साकीनाका गौसिया चाळ परिसरात रात्रभर पडलेल्या पावसामुळे डोंगराचा काही भाग कोसळला. या घटनेत दोन ते तीन घरांवर दरड कोसळली असून पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.

दोन ते तीन घरांवर कोसळली दरड

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगराचा काही भाग अचानक कोसळला आणि त्यातील माती व दगड दोन-तीन घरांवर पडले. यामुळे काही व्यक्ती घरात अडकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अधिकृत आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नसली तरी प्राथमिक अंदाजानुसार पाच ते सहा जण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.  ढिगाऱ्या खाली अडकलेल्या 4 व्यक्तींचे मृतदेह बाहेर काढले आहे. तर इतर 2 मृतदेह बाहेर काढण्याचे ndrf आणि अग्निशमन दल जावंनांकडून प्रयत्न सुरु आहेत. मोहम्मद समीर अन्सारी, साहिल हुसेन अब्दुल काझी, अबान आरिफ शेख, मनत आरिफ शेख, मर्जिना आरिफ शेख यांना मृत घोषित केले आहे.  तर चौघांवर उपचार सुरु आहेत.

अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरुवात केली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून प्रशासनाने परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

घाटकोपर आणि साकीनाक्याच्या मध्ये असलेल्या अशोक नगर येथे मोठी दुर्गघटना घडली आहे. येथील गौसिया चाळीवर डोंगराचा काही भाग कोसळला असल्याचे माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत पात ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि घाटकोपर पोलीस दाखल झाले आहेत. सध्या संबंधित विभागाकडून बचावकार्य सुरू आहे.

डीसीपी गणेश शिंदे यांनी घटनेची माहिती देत म्हटले की, “पावसामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर परिसरात भूस्खलन झाले आहे. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह बीएमसी, एनडीआरएफ आणि इतर संस्थांच्या अधिकाऱ्यांसह सर्व आवश्यक पथके येथे तैनात करण्यात आली आहेत. ही घटना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे ४-५ लोक अडकले असण्याची शक्यता आहे.”

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान