AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक

TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक

| Edited By: | Updated on: Aug 11, 2026 | 4:14 PM
Share

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सोलापुरातील खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने सोलापुरातून ही कारवाई केली.

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सोलापुरातील खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने सोलापुरातून ही कारवाई केली.

प्रकाश पवार हा सोलापुरातील कुमठे गावात ‘ध्रुव प्रतिष्ठान’ या नावाने खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याची माहिती आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून तो विद्यार्थ्यांना पोलीस भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत असल्याचे सांगण्यात येत आहे. TET पेपरफुटी प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काही जणांच्या संपर्कात प्रकाश पवार असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. तसेच काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे त्याने मुख्य आरोपींपर्यंत पोहोचवल्याचा संशय पोलिसांना आहे.

मात्र, विद्यार्थ्यांची कागदपत्रे आरोपींना नेमकी का देण्यात आली आणि प्रकाश पवारचा TET पेपरफुटी प्रकरणात नेमका सहभाग काय होता, याचा तपास सध्या भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाकडून सुरू आहे. त्याच्या संस्थेतून महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर पुरावेही तपास यंत्रणेकडून शोधले जात आहेत. भिवंडी येथे TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास भिवंडी पोलिसांचे विशेष पथक करत आहे. या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

तपासाच्या सुरुवातीला दिल्ली, आग्रा आणि बिहारमधून काही आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर तपासाची व्याप्ती महाराष्ट्रापर्यंत पोहोचली आणि सोलापुरातील प्रकाश पवार याचे नाव तपासात समोर आले. प्रकाश पवारला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर आणि तपासात समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी यापूर्वी उत्तर भारतातील विविध ठिकाणी कारवाई केली होती. तपासाची व्याप्ती वाढल्यानंतर महाराष्ट्रातील काही व्यक्तींच्या भूमिकेचा तपास सुरू करण्यात आला. त्यातून प्रकाश पवारचे नाव समोर आले.

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या काही आरोपी विद्यार्थ्यांना प्रकाश पवारने काही कागदपत्रे पुरवल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही कागदपत्रे कोणत्या कारणासाठी देण्यात आली, त्यांचा पेपरफुटीशी काय संबंध आहे आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. प्रकाश पवारला आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता असून, त्याच्या चौकशीतून TET पेपरफुटी प्रकरणातील महाराष्ट्रातील आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे आता तपास यंत्रणेसह परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 11, 2026 04:12 PM

Follow Us