AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही तलवारीने डास मारत आहात, असे चालणार नाही, धडाधड धाडी टाकणाऱ्या FDA ला मुंबई हायकोर्टाची चपराक

मुंबई उच्च न्यायालयाने कॅडिला फार्मास्युटिकल्स विरोधात एफडीए केलेला विक्रीबंदीचा आदेश रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने म्हटले की, कायदा राबवण्याची उचित प्रक्रिया आहे तिचे पालन व्हायलाच हवे.

तुम्ही तलवारीने डास मारत आहात, असे चालणार नाही, धडाधड धाडी टाकणाऱ्या FDA ला मुंबई हायकोर्टाची चपराक
Tukaram Mundhe
| Updated on: Aug 12, 2026 | 12:06 AM
Share

कॅडिला फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीला दिलासा देताना महाराष्ट्र फूड एण्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) च्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार टीका केली आहे. या कंपनीच्या औषधाची विक्री रोखण्याच्या एफडीएच्या आदेशांवर सवाल करत ‘आधी गोळी चालवणे आणि नंतर प्रश्न विचारणे’ हा टोळीच्या काळातील कायदा असू शकतो. परंतू वास्त जीवन आणि कायद्यात याला काहीही स्थान नाही अशा शब्दात टीका केल्ययानंतर महाराष्ट्र एफडीए कॅडिलाच्या विरोधातील विक्रीवर लावलेला बंदी आदेश मागे घेतला आहे.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती आरवी घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानसमोर कॅडीला फार्मास्यूटिकल्सच्या याचिकेवर सुनावणी होत होती. कंपनीने एफडीएने त्यांच्या औषधांचे स्टॉक जप्त करणे आणि त्याच्या विक्री तसेच वितरणावर लावलेल्या बंदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. या प्रकरणात खंडपीठाने एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

कोर्ट म्हणाले की आधी गोळी चालवणे आणि नंतर प्रश्न विचारणे वाईल्ड वेस्ट ( जंगली टोळी युगीन ) नियम आहे. जो कायद्याच्या राज्यात लागू होत नाही. कायद्यात अशी कारवाई केली जाऊ शकत नाही. यावेळी खंडपीठ म्हणाले की हॉटेल प्रकरणातही तुमही आधी गोळी चालवता नंतर प्रश्न विचारता. या प्रकरणातही हेच होत आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एफडीएने कॅडिलाच्या अनेक औषधांचे स्टॉक जप्त करण्यासह त्यांच्या विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे. कॅडिलाच्या वतीने वकील वीरेंद्र सराफ यांनी या आदेशांना रद्द करण्याची मागणी केली. एफडीएच्या कारवाईने कंपनीला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हायकोर्टाने स्पष्ट केले की त्यांना एफडीएच्या कायदेशीर अधिकारावर कोणताही संशय नाही. मात्र प्रश्न या अधिकाऱ्याच्या वापराच्या पद्धतीवर आहे. मुख्य न्यायमूर्ती आरवी घुगे यांनी एफडीएच्या वकील नेहा भिडे यांनी म्हटले की आम्हाला तुमच्या शक्तीवर कोणताही शंका नाही.समस्या ही आहे की तुमच्याकडे तलवार चालवण्याची शक्ती आहे,पण तुम्ही तिचा वापर डास मारण्यासाठी करत आहात. कोर्टाने म्हटले की मुद्दा हा नाही की एफडीएच्या कारवाई करण्याचा अधिकार नाही. मात्र त्या अधिकाराचा वापर उचित प्रक्रिया आणि प्रमाणात करायला हवा.

रुग्णांना औषध न मिळाल्याने कोर्टाची चिंता

सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने म्हणाले, त्यांची प्राथमिक चिंता कॅडिलाला झालेल्या आर्थिक नुकसानीची नसून, रुग्णांवर होणाऱ्या परिणामाची आहे. एफडीएच्या विक्रीबंदीच्या आदेशामुळे रुग्णांना संबंधित औषधे मिळाली नाहीत. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणाले, की हे औषध २० दिवस विकले गेले नाही.कंपनीला झालेल्या आर्थिक नुकसानीची आम्हाला चिंता नाही. हे औषध २० दिवस रुग्णांना उपलब्ध झाले नाही ही आमची चिंता आहे. आजपर्यंत प्रत्यक्षात ३२ दिवसांचा कालावधी झाला आहे.

Follow Us
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा