AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो सराईत खोटारडा, अनप्रोफेशनल..; दिग्दर्शकाच्या आरोपांवर ओंकार भोजने स्पष्टच बोलला..

अभिनेता ओंकार भोजने याच्यावर 'अफरातफरी' या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी काही गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर आता ओंकारने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याची बाजू स्पष्ट केली आहे.

तो सराईत खोटारडा, अनप्रोफेशनल..; दिग्दर्शकाच्या आरोपांवर ओंकार भोजने स्पष्टच बोलला..
ओंकार भोजनेImage Credit source: Youtube
| Updated on: Sep 29, 2026 | 11:52 AM
Share

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओंकार भोजने लवकरच ‘अफरातफरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच दिग्दर्शकांसोबतचा त्याचा वाद चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ओंकारवर ‘खोटारडा आणि अनप्रोफेशनल’ असे गंभीर आरोप केले. “ओंकार भोजनेला आम्ही जूनमध्ये सांगितलं होतं की ऑक्टोबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होतोय, पण तो एवढा व्यस्त आहे की तो कोणाचेही फोन उचलत नाहीये. गेले चार महिने हेच सुरू आहे. ओंकार अत्यंत अनप्रोफेशनल अभिनेता आहे. कलाकार म्हणून तो उत्तम काम करतो पण माणूस म्हणून सॉरी.. खूप अनप्रोफेशनल आणि सराईत खोटारडा आहे”, असे आरोप दिग्दर्शकांनी केले. या आरोपांवर आता ओंकारने मौन सोडलं आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत त्याने त्याची बाजू मांडली आहे.

‘मित्र म्हणे’ या पॉडकास्ट मुलाखतीत ओंकार म्हणाला, “याचं जर मी मुद्द्यातच उत्तर द्यायचं झालं तर मी नेमून दिलेले ईपी असतात, त्यांच्या संपर्कात आहे. माझ्या कामाची पद्धत अशी आहे की मी कामात असताना माझा मोबाइल ‘फ्लाइट मोड’वर असतो. त्यामुळे त्यादरम्यान येऊन गेलेले कॉल मला कळतात आणि त्यांना काम झाल्यावर मी कॉलबॅक करतो. त्यांनी तसं का म्हटलं, हे मला नेमकं माहीत नाही.”

येतो, येतो म्हणतो आणि येत नाही, या आरोपांवरही त्याने स्पष्टीकरण दिलं. “शनिवारी कळवण्यात आलं होतं की सोमवारी पुण्यात कार्यक्रम आहे. त्या हिशोबाने मी सर्व कामाचं आणि टेलिव्हिजनच्या शूटिंगचं नियोजन केलं होतं. पण नंतर मला सांगण्यात आलं की पुण्याचा कार्यक्रम नाहीये. तर येतो, येतो म्हणून येत नाही.. हा आरोपच योग्य नाही. प्रमोशन हल्लीच सुरू झालं आहे. 21 सप्टेंबरला ट्रेलर लाँचचा कार्यक्रम होता. पण तो नंतर 22 सप्टेंबरला पुढे ढकलण्यात आला. मी 21 तारखेनुसार सर्व नियोजन केलं होतं. त्यामुळे ऐनवेळी मी बदल करू शकत नव्हतो,” असं तो पुढे म्हणाला.

“अभिनेता म्हणून माझं जे मुख्य काम होतं, ते मी केलं होतं. पण पीआर आणि बाकीचे जे फंडे आहेत.. या अँगलने कर, त्या अँगलने कर.. हे मला पटत नाही. मी सोशल मीडियावर नाही, त्यामुळे या गोष्टी मला जमत नाहीत. माझ्यात ते स्कील नाही. प्रमोशनचे जे मुख्य टप्पे असतात, ते मी करू शकतो. त्याव्यतिरिक्त मला भाग घेता येणार नाही. करारात पीआरची स्ट्रॅटेजी आधी कळत नाही,” अशा शब्दांत ओंकारने त्याची बाजू मांडली आहे.

Follow Us
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा