AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Wedding : भारतीय पुरुषांना लग्नानंतर काय हवं असतं! मोठा दावा, कटू सत्य अखेर समोर

Indian Wedding : भारतीय पुरुष लग्न का करतात आणि त्यांना लग्नानंतर काय हवं असतं? याबद्दल मोठा दावा करण्यात आला आहे... या संदर्भात एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे... हा व्हिडीओ व्हायरल होताच कटू सत्य समोर आलं आहे.

Indian Wedding : भारतीय पुरुषांना लग्नानंतर काय हवं असतं! मोठा दावा, कटू सत्य अखेर समोर
| Updated on: Sep 29, 2026 | 11:45 AM
Share

महिला आणि पुरुष दोघांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा लग्न असतो… भारतीय संस्कृतीत लग्नाला फार मोठं महत्त्व आहे. पण भारतीय पुरुष लग्न का करतात? असा विचार कधी केलाय…! जर कोणी असं म्हणत असेल, पुरुष लग्न प्रेमासाठी नाही तर, घर कामांपासून दूर राहण्यासाठी करतात… हे ऐकून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. मात्र, एका इटालियन व्यक्तीने सोशल मीडियावर असाच दावा केला आणि काही काळातच त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये इटालियन व्यक्तीने भारतीय पुरुषांबद्दल स्वतःचं मत मांडलं, ज्यामुळे वाद सुरु झाले आहेत.

कोणी इटालियन व्यक्तीच्या मताचं समर्थन केलं आहे, तर कोणी असं म्हणत आहे की, देशातील सर्वच पुरुषांना असं म्हणणं चुकीचं आहे… पण एक गोष्ट तितकीच सत्य आहे आणि ती म्हणजे. इटालियन व्यक्तीच्या व्हिडीओनंतर, लग्न आणि नात्यांबद्दल लोकांनी विचार करण्यास सुरुवात केली आहे.

व्हिडीओमध्ये इटालियन व्यक्ती स्पष्ट बोलताना दिसत आहे की, ‘काही भारतीय पुरुष लग्न प्रेमासाठी नाही तर, घर काम टाळण्यासाठी करतात.’ व्यक्ती पुढे दावा करतो की, असे पुरुष लग्नानंतर स्वतःचे कपडे देखील जागेवर ठेवत नाहीत, स्वतःची खोली देखील स्वच्छ ठेवत नाहीत. त्यांचं एकच मत असतं आणि ते म्हणजे. बायको सर्वकाही सांभाळून घेईल…

View this post on Instagram

A post shared by Naveen (@newwmonk)

त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की, जर कोणी स्वतःचं घर सांभाळू शकत नाही, तर लग्नाचा अर्थ असा होत नाही की, आपली जबाबदारी दुसऱ्यावर सोपावणं… बायको सर्वकाही सांभाळून घेईल… असे अनेक पुरुषांचे विचार असतात. फक्त हाच एक मुद्दा सध्या चर्चेत आहे.

व्हिडीओ समोर येताच, अनेक कमेंट सेक्शनमध्ये स्वतःचं मत मांडलं आहे… काही लोकांचं असं म्हणणं आहे की, ‘आज देखील अनेक घरांमध्ये महिलांवर फार ओझं आहे.’, तर अनेकांचं म्हणणं असं देखील आहे की, प्रत्येक भारतीय पुरुष असा नाही आणि एका अनुभवाच्या जोरावर सर्वांवर निशाणा साधणं योग्य नाही. यात कारणामुळे विषय सध्या चर्चेत आहे.

फक्त भारताबद्दल सुरुये चर्चा…

अनेक लोकांनी हे देखील निदर्शनास आणून दिलं की, घरगुती कामांबाबतच्या अशा चर्चा केवळ भारतापुरत्याच मर्यादित नाहीत. जगभरातील अनेक देशांमध्ये पती-पत्नींमध्ये घरगुती जबाबदाऱ्यांविषयी अशाच प्रकारच्या चर्चा होत असतात. त्यामुळे, खरा मुद्दा एखाद्या विशिष्ट देशाला वेगळं ठरवण्याचा नसून, नातेसंबंधांमधील समानतेची संकल्पना समजून घेण्याचा आहे.

सांगायचं झालं तर, त्या इटालियन व्यक्तीच्या मताशी कोणी सहमत असो वा नसो, पण त्याच्या व्हिडिओने नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. वैवाहिक जीवनातील घरगुती कामांकडे केवळ ‘मदत करणं’ म्हणून पाहिलं जावं की ‘सामायिक जबाबदारी’ म्हणून? याचं उत्तर प्रत्येक नात्यानुसार वेगळं असू शकतं, परंतु मोकळा संवाद आणि जबाबदाऱ्यांची विभागणी या गोष्टीच कोणत्याही नात्यात खऱ्या अर्थाने सुधारणा घडवून आणू शकतात.

Follow Us
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा