AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा रेटा, मुंबईत आंदोलनापूर्वीच पोलिसांकडून धरपकड, वातावरण तापले

Sub Classification of Reservation SC/ST: उपवर्गीकरण लागू करावे या मागणीसाठी मातंग समाजाने मुंबईत उग्र आंदोलन केले. तर आंदोलनापूर्वी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. काय आहे मुंबईतील मोठी घडामोड?

उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा रेटा, मुंबईत आंदोलनापूर्वीच पोलिसांकडून धरपकड, वातावरण तापले
उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचे आझाद मैदानात आंदोलन
| Updated on: Sep 29, 2026 | 11:19 AM
Share

Matang Community Agitation on Mumbai Azad Maidan: अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील उपवर्गीकरणावरून राज्यात वातावरण तापलेले असतानाच मुंबईत आज मोठी घडामोड घडली. उपवर्गीकरण लागू करावे यासाठी मातंग समाजाने आंदोलन केले. या आंदोलनावेळी मंत्रालय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी तातडीने आंदोलकांची धरपकड सुरू केली. काही आंदोलनकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडपट झाल्याचे दिसून आले. आझाद मैदानाच्या बाहेर आंदोलक आक्रमक झाले. आता पोलीस बॅरिकेटिंग लावत आहेत. पण काही काळ या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. हा परिसर घोषणांनी दणाणून गेला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे.

उपवर्गीकरणीच अंमलबजावणी त्वरीत करा

आज आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आज लाखोंच्या संख्येने समाज बांधव आझाद मैदानात येणार आहे. अनुसूचित जाती मधील आरक्षणचा फायदा या काही मोजक्या समाजाने घेतला होत यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवून हे अनुसूचित जाती मधील आरक्षणच उपवर्गीकरण झाला पाहिजे असा निर्णय दिला आहे पण याची अंमलबजावणी ही राज्य सरकार कडून करण्यात येत नसल्यामुळे आम्हाला हे आज आंदोलन करावं लागत असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे भाजप आमदार अमित गोरखे यांनी दिली.

आमच्या हक्काचं आरक्षण द्या

आम्हाला कोणाच्या ताटातील आरक्षण नको आहे आम्हाला आमच्या हक्काच आरक्षण हवं आहे आणि आमची लोकसंख्या किती तेवढं आरक्षण आम्हाला हव आहे ही आमची साधी मागणी आहे आणि या मागणीला इतर समाज देखील पाठिंबा देतील. कोण या आंदोलनाला विरोध करत आहे हे मला माहीत नाही पण आज अनुसूचित जातीमधील सर्व समाज घटकातील बांधव हे सजग झाले आहेत आणि ते आपल्या हक्कांसाठी लढत आहेत, असे गोरखे म्हणाले.

वेळप्रसंगी आम्हाला आमच्या राज्य सरकार च्या विरोधात देखील भूमिका घ्यावी लागेल पण आमची आरक्षण कृती समिती आहे या आंदोलांनंतर कोणती भूमिका घ्यायची आहे यासंदर्भातील सर्व निर्णय ती समिती घेणार असे त्यांनी स्पष्ट केले.

रमेश कदम नजरकैदेत

मुंबईत मातंग समाजाच्या मोर्चात सहभागी होण्यापूर्वीच NCP चे माजी आमदार रमेश कदम यांना पोलिसांनी हाऊस अरेस्ट, नजरकैद केले आहे. रमेश कदम यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन केले की आपल्याला आरक्षणाचा जीआर घ्यायचा आहे. मी अकरा वाजता मेट्रो सिनेमा जवळ येत आहे. तुम्ही पण या आपल्याला आरक्षणाचा जीआर घ्यायचा आहे. मी आता मातंग समाजाच्या आरक्षणाचा जीआर घेण्यासाठी आझाद मैदानाकडे येत आहे. मातंग समाजाच्या तरुणांनो, तुम्हीही मोठ्या संख्येने या, असे आवाहन केले होते. पोलिसांनी खबरदारी म्हणून रमेश कदम यांना नजर कैद केले आहे.

Follow Us
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत