AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

S.Chockalingam: SIR वादादरम्यान राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचाही सवाल, निवडणूक आयोगाला थेट पत्र, मागणी काय?

S. Chockalingam Letter to Election Commission: SIR वादादरम्यान राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला थेट पत्र धाडलं आहे. त्यांनी पत्रातून काय काय मागणी केली आहे?

S.Chockalingam: SIR वादादरम्यान राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचाही सवाल, निवडणूक आयोगाला थेट पत्र, मागणी काय?
एस. चोक्कलिंगम, ज्ञानेश कुमार
| Updated on: Sep 29, 2026 | 10:41 AM
Share

देशात मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेवरून (SIR ) रणकंदन सुरू आहे. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानंतर देशातील विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे रविवारच्या आंदोलनाविषयी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. दरम्यान त्याचवेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला थेट पत्र धाडलं आहे. त्यांनी पत्रातून काय काय मागणी केली आहे?

एस. चोक्कलिंगम यांचे आयोगाला पत्र

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मतदार याद्यांच्या पडताळणी प्रक्रियेत स्थानिक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांचे (ERO) अधिकार पूर्ववत करावेत. सोबतच ‘ECINet’ सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते महत्त्वाचे बदल करण्यात यावेत अशी मागणी या पत्रातून केली आहे. महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान स्थानिक अधिकाऱ्यांचे अधिकार सॉफ्टवेअरमुळे सीमित झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिले आहे. कायदेशीररीत्या अधिकाऱ्यांना असलेले अधिकार वापरता यावेत, यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत.

काय आहेत मागण्या?

1. ज्येष्ठ नागरिक-दिव्यांगाना विशेष सूट: कागदपत्रे वैध असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी न बोलावता सूट देण्याचा पर्याय ‘ECINet’ मध्ये उपलब्ध करून द्यावा.

2. अतिरिक्त कागदपत्रांची मान्यता- आदिवासी, बेघर आणि वंचित घटकांसाठी नेहमीच्या १३ दाखल्यांव्यतिरिक्त इतर पर्याय उपलब्ध करावेत.

3. स्थानिक स्तरावर निर्णय: मतदार यादीतील त्रुटींवर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याऐवजी ERO अधिकाऱ्यांनाच असावेत.

4. लिखित मार्गदर्शक सूचना: प्रक्रियेत सुस्पष्टता आणण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तोंडी सूचनांऐवजी लेखी नियमावली जारी करावी.

शनिवार-रविवारी विशेष शिबिर

राज्यात मतदारयादी विशेष सखोल तपासणीअंतर्गत शनिवार-रविवारी विशेष शिबिर राबवण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी ही माहिती दिली आहे. मतदार यादीतील नाव, पत्ता आणि नोंदणीतील त्रुटी दुरुस्त करण्याची सुविधा मिळणार आहे. राज्यातील १ लाख ३०० मतदान केंद्रांवर विशेष मोहीम राबवली जात आहे. मुंबईतील १० हजार मतदान केंद्रांवरही शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

१८ वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदारांसाठी महाविद्यालयांमध्ये नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. मतदार यादीतील दावे-हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्राप्त दावे आणि हरकती १० नोव्हेंबरपर्यंत निकाली काढणार आहेत. महाराष्ट्राची अंतिम मतदारयादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहेत. नवमतदारांनी विशेष शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत