थोडक्यात बचावले, असा घडला अपघात… धक्कादायक VIDEO व्हायरल
लंडनच्या हिथ्रो विमानतळावर ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून मोठा अपघात टळला. जोरदार वाऱ्यांमुळे विमान लँडिंगच्या वेळी हवेत कलले, त्याची शेपटी रनवेला दोनदा आदळली (डबल टेल स्ट्राईक). प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, पायलटच्या सतर्कतेने 'गो-अराउंड' करत विमान सुरक्षितपणे उतरवले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विमान आणि हेलिकॉप्टर अपघाताच्या भयानक घटना घडत आहेत. त्यामुळे विमानातून प्रवास करावा की करू नये, अशी भीती प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर गुरुवारी असाच एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. तो पाहून तिथे असणाऱ्या सर्वच लोकांचा श्वास वर खाली झाला. अनेकांच्या पोटात गोळा आला. ब्रिटिश एअरवेजचं एक प्लेन लँडिंगच्या वेळी हवेत झुकलं. त्याची शेपटी दोनवेळा रनवेला धडकली. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
BA431 ही संख्या असलेलं विमान एम्सटर्डमवरून लंडनला जात होतं. प्लेन Airbus A321neo होतं. या विमानातून 200 प्रवाशी प्रवास करत होते. सकाळी सुमारे 10.30 वाजता प्लेन हिथ्रो टर्मिनल 5 वर लँड करणार होतं. त्याचवेळी अचानक विमान हवेतच कललं. डाव्या आणि उजव्या साईडला विमान झुकू लागलं. विमानाचं डावं चाक जमिनीला धडकलं. त्यानंतर अचानक विमानाचा मागचा भाग म्हणजे शेपटी दोनदा रनवेला धडकली. याला Double Tail Strike म्हणतात.
पायलटची सतर्कता
परिस्थिती बिघडलेली पाहून पायलटने लगेच लँडिंग थांबवली. प्लेन परत हवेत उडवलं. याला Go Around म्हणतात. त्यानंतर प्लेनने दुसरी चक्कर मारली. त्यानंतर सुमारे 10:49 वाजता सर्वांना सुरक्षित पद्धतीने लँड केलं. विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत.
Caught live on our 24/7 Camera BA431 encountered a double tail strike upon landing at Heathrow Airport this morning. What happened here? #aviation #avgeek https://t.co/NRUY3r9GfL
— BIG JET TV (@BigJetTVLIVE) November 12, 2026
व्हिडीओ कुणी बनवला?
हा संपूर्ण व्हिडीओ BigJet TV च्या लाइव्ह स्ट्रिममध्ये कैद झाला आहे. प्लेन हवेतच डोलताना आणि त्याची शेपटी रनवेला धडका देताना या व्हिडीओत दिसत आहे. या घटनेवर ब्रिटिश एअरवेजने प्रतिक्रिया दिली आहे. प्लेन सुरक्षित लँड झालं आहे. आणि आम्ही AAIB (Air Accidents Investigation Branc) च्या चौकशीला सहकार्य करत आहोत. सध्या या विमानाचं दोन दिवस उड्डाण होणार नाहीये. लँडिंगच्यावेळी प्रचंड वारे वाहत होते. त्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.
