AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांना काय हवंय ते अद्याप… छगन भुजबळ यांचं विलिनीकरणावर मोठं विधान; पडद्यामागे काय घडतंय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. त्यांना नेमके काय हवे हे अद्याप कळले नसल्याचे ते म्हणाले. विलिनीकरण सामूहिक निर्णय असावा यावर त्यांनी जोर दिला. शरद पवार हे माझे नेते असून त्यांच्या भेटीमागे राजकीय चर्चा नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. दोन्ही गट एकत्र आल्यास जुन्या कार्यकर्त्यांना आनंद होईल असेही त्यांनी नमूद केले.

त्यांना काय हवंय ते अद्याप... छगन भुजबळ यांचं विलिनीकरणावर मोठं विधान; पडद्यामागे काय घडतंय?
chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2026 | 1:28 PM
Share

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं आहे. आमच्या पक्षातील सर्व नेते आणि आम्ही बसून निर्णय घेऊ. त्यांना काय हवंय हे अद्याप आम्हाला कळलं नाही. आम्ही विचार करतो तेव्हा हे कसं काय जमणार आहे? सर्व एनडीएत जाणार आहेत? की सर्व इंडिया आघाडीत जाणार आहेत? याचा शोधबोध झाला नाही. सुनेत्रा ताईंनी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ येईल तेव्हा सर्वांना कळेल. त्या आधी मला खात्री आहे, सुनेत्राताई आम्हा सर्वांना विश्वासत घेऊन सांगतील, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. भुजबळ यांनी थेटच प्रतिक्रिया दिल्याने दोन्ही राष्ट्रवादीच विलिनीकरणाची चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. मीडियाशी संवाद साधत असताना भुजबळ यांनी हे महत्त्वाचं विधान केलं आहे.

विलिनीकरणाच्या चर्चा आम्ही सुद्धा ऐकत आहोत. सध्या मर्जर मर्जरचा खेळ सुरू आहे. विलिनीकरण व्हायचंच असेल तर दोन्ही बाजूने सांघिकरित्या खेळलं पाहिजे. एखादा प्लेअर जातो, तिकडे संपूर्ण टीम असते. काही चर्चा होते. मग काही झालं तर परत घरी येतात, असं चालत नाही. सांघिकरित्या खेळा. क्रिकेटची मॅच सुरू आहे. एकमेकांच्या गळ्यात हात घालून ठरवा. एकत्रितरित्या ठरवा. तुटक तुटक कुणीही असं काही करावं असं वाटत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. आमच्यापर्यंत विलिनीकरणाच्या गोष्टी आल्या नाहीत. आम्हीही टीव्हीवर पाहत आहोत. कोण भेटतंय, कोण जातंय, काय झालं ते कळत नाही. तुम्ही त्यातून जो निष्कर्ष काढता तो आम्ही ऐकत असतो, असंही त्यांनी म्हटलंय.

शरद पवार माझे नेते

शरद पवार यांना अजितदादा गटाचे आमदार भेटत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. पवार साहेबांना भेटायला मीही गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. घरीही गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जाणं चूक नाही. माझ्या आयुष्यात दोन नेते आहेत. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार आहे. हे दोन्ही नेते माझे मार्गदर्शक आहेत. दुर्देवाने बाळासाहेब आज हयात नाही. पण शरद पवार यांचा पक्ष वेगळा आहे. मी वेगळ्या पक्षात आहे. बाकी सर्व माझे सहकारी आहेत. पक्षातील नेते आहेत, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

पवारांना भेटलो, पण चर्चा नाही

मीही शरद पवारांना भेटलो. पण मर्जर मर्जर खेळाची चर्चा केली नाही. आमचे चांगले संबंध आहेत. पवारांचा स्वभाव असा आहे की, राजकारणातील किती मोठा दुश्मन असला तरी ते त्याच्याशी संबंध ठेवतात. त्याच्याशी प्रेमाने बोलतात. प्रत्येक गोष्टीत शत्रूत्व ठेवत नाहीत. ही गोष्ट आम्ही शिकलो. राज्यातील ते सर्वात ज्येष्ठ नेते आहेत, असं त्यांनी सांगितलं.

दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच

सर्व एकत्र आले तर आनंद आहे. उद्या दोन्ही शिवसेना एकत्र आल्या, ठाकरे बंधू एकत्र आले तर जुन्या शिवसैनिकांना आनंद होईल. तसेच दोन पवार एकत्र आले तर ज्यांनी राष्ट्रवादी स्थापन करण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्यांना आनंद होईल. शरद पवार आणि मी राष्ट्रवादीची स्थापना केली. काही लोक त्यावेळी राष्ट्रवादीत यायला मागे पुढे पाहत होते. काँग्रेसमध्ये राहावं की राष्ट्रवादीत यावं असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे काही लोकं चार महिन्याने राष्ट्रवादीत आले. काही सहा महिन्याने आले. पण दोन्ही पवार एकत्र आले तर जुन्या जाणत्यांना आनंदच होईल, असं ते म्हणाले.

Follow Us
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही
NCP Merger : पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान पुण्यात राजकीय खलबतं
सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका
सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी...
NCP Merger : सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी; विलीनीकरणाबाबत विचारला थेट सवाल, नेमकं काय सुरू आहे?
संजय शिरसाटांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?