पर्यटकाने टूर गाईडला समुद्रात ढकलले अन्…; इस्रायली पर्यटकाचे कृत्य कॅमेऱ्यात कैद, Video Viral
श्रीलंकेत एका टूर गाईडला बोटीवरून अचानक समुद्रात ढकलल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर संताप व्यक्त करत आहेत. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

फिरायला गेलेल्या अनेकदा अश्या घटना घडतात की आपल्याला बघून रागही येतो आणि हैराणही होतो. अशीच काही घटना श्रीलंकेत बघायला मिळाली. श्रीलंकेच्या समुद्रातून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही पर्यटक बोटीवर बसलेले दिसत आहेत. या लोकांसोबत एक पर्यटन गाईडची आहे जो आपलं काम करत आहे. पण त्याच्यासोबत हे पर्यटक काही योग्य व्यवहार करताना दिसत नाहीत. नेमकं काय घडतं हे जाणून घेऊयात.
गाईडसोबत काय घडलं?
व्हिडीओमध्ये सुरुवातीला दिसते की पर्यटकांसोबत टूर गाईड बसलेला आहे. गाईड पाणी पिताना दिसत आहे. पण अचानक त्याच्याजवळ बसलेला पर्यटक त्याला समुद्रात धक्का देतो. अचानक धक्क्यामुळे गाईड काही क्षणातच पाण्यात पडतो. यानंतर बोटीत बसलेले पर्यटक मोठ्याने हसतात. ते या घटनेची मज्जा घेतात पण त्या गाईडला बोटीत येण्यासाठी मदत करताना दिसत नाहीत.
Israeli tourists filmed themselves laughing as they pushed a Sri Lankan boat operator into the water during a boat ride in Sri Lanka. Following widespread backlash, the tourists claimed “it was just a joke” and that they “didn’t mean to be mean,” adding that they are “good kids” about to enlist in the military next month and “don’t deserve this hate.”
وثق سياح إسرائيليون أنفسهم وهم يدفعون عاملاً سريلانكياً يقود قارباً في المياه أثناء عمله، مستمتعين بالضحك عليه أثناء سقوطه في البحر. ورداً على الغضب الواسع الذي أثاره مقطع الفيديو، برر السياح فعلتهم بـ “أنها كانت مجرد مزاح”، مدعين أنهم “شباب طيبون يستعدون للتجنيد في الجيش الشهر المقبل ولا يستحقون هذا الهجوم”.
— Eye on Palestine (@EyeonPalestine) November 9, 2026
कोण होते ते पर्यटक?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसणारे पर्यटक हे इस्रायली असल्याचा दावा केला जात आहे. याबद्दल अधिकृत पुष्टी झालेली नाही. याशिवाय हे ही ,माहित नाही की श्रीलंकेतील नेमक्या कोणत्या ठिकाणी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला गेला आहे.
लोकांनी व्यक्त केला संताप
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. अनेक वापरकर्त्यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, स्थानिक मार्गदर्शकासोबत अशा प्रकारे वागणे पूर्णपणे चुकीचे आहे. तो तिथे आपले काम करण्यासाठी होता, पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी नव्हे. यांच्या मते ही गोष्ट जीवावर बेतू शकते. अचानक धक्का दिल्याने माणूस घाबरू शकतो आणि त्याला मारही लागू शकतो. अनेकांनी असाही प्रश्न केला की यामध्ये हसण्यासारखं काय आहे? असं करण्यामागे काय कारण होते? लोकांनी असेही मत व्यक्त केले की, दुसऱ्या देशाला भेट दिली म्हणजे तिथे काम करणाऱ्या लोकांशी मनमानी किंवा उद्धटपणे वागण्याचा अधिकार कोणालाही मिळत नाही. स्थानिक मार्गदर्शक आणि इतर कर्मचारीही आदरास पात्र आहेत.
जगभरातून पर्यटक श्रीलंकेला देतात भेट
जगभरातून पर्यटक श्रीलंकेला भेट देतात. तिथला पर्यटन उद्योग स्थानिक लोकांसाठी उत्पन्न आणि रोजगाराचा एक प्रमुख स्रोत आहे. अशा परिस्थितीत, समोर आलेल्या काही व्हिडीओंमुळे श्रीलंकेत पर्यटकांच्या वर्तणुकीबाबत चर्चा सुरू झाली आहे. बहुतेक पर्यटक स्थानिक लोकांचा आणि त्यांच्या उपजीविकेचा आदर करतात.
