AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Merger : सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी; विलीनीकरणाबाबत विचारला थेट सवाल, नेमकं काय सुरू आहे?

NCP Merger : सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी; विलीनीकरणाबाबत विचारला थेट सवाल, नेमकं काय सुरू आहे?

| Updated on: Nov 13, 2026 | 10:20 AM
Share

सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर आमदारांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. संजय राऊत यांनी २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा केला असताना, सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाचा प्रस्ताव नसल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाभोवती मोठ्या घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांना संपर्क साधण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे फोन सुरू असून, पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर आमदारांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जाते.

या फोनमध्ये आमदारांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संपर्क साधण्यात आला होता का, पक्षाच्या सध्याच्या घडामोडींवर त्यांचे मत काय आहे आणि पक्षाचे विलीनीकरण करणे योग्य वाटते का, असे प्रश्न विचारले जात असल्याची माहिती आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी यापूर्वी २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता, त्यानंतर हे संपर्क सुरू झाले आहेत. मात्र, अजित पवार यांच्या गटाने हे दावे फेटाळून लावत, ४१ आमदार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, सुप्रिया सुळे यांनी मात्र विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नसल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे राजकीय सस्पेन्स आणखी वाढला आहे.

Published on: Nov 13, 2026 10:20 AM

Follow Us