AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड

महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड

| Updated on: Nov 12, 2026 | 8:02 PM
Share

सोलापूरच्या अक्कलकोट येथील शांभवी अजगुंडे या अकरावीतील विद्यार्थिनीने बाल सुरक्षेसाठी सेफ फ्लाय स्मार्ट आयडी कार्ड नावाचे एक अनोखे उपकरण विकसित केले आहे. प्रवासात लहान मुलांना किडनॅपिंग, अपघात किंवा छेडछाडीसारख्या समस्यांपासून वाचवण्यासाठी हे उपकरण पालकांना मुलांचे लोकेशन ट्रॅक करण्यास आणि मार्गदर्शन करण्यास मदत करते. या अभिनव प्रकल्पाची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या शांभवी अजगुंडे या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने बाल सुरक्षेसाठी एक अभिनव उपकरण तयार केले आहे. सेफ फ्लाय स्मार्ट आयडी कार्ड असे या उपकरणाचे नाव असून, लहान मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. पुण्यातील नसरापूर येथील घटनेनंतर बाल सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमुळे शांभवीला हे उपकरण बनवण्याची प्रेरणा मिळाली. हे डिव्हाईस जीपीएस, ब्लूटूथ आणि कॅमेराच्या साहाय्याने काम करते. मुलांच्या प्रवासादरम्यान पालक त्यांना लाईव्ह ट्रॅक करू शकतात, आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करू शकतात आणि संकटात असताना आपत्कालीन बटन वापरून त्यांना मदत मागता येते.

घरातून निघाल्यावर किंवा शाळेत पोहोचल्यावर पालकांना सूचना मिळते. शाळेत असताना गोपनीयतेसाठी प्रणाली निष्क्रिय होते, तर प्रवासात किंवा आपत्कालीन स्थितीत ती सक्रिय राहते. या प्रोजेक्टची केंद्र सरकारच्या इन्स्पायर योजनेअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून, तिला आता जपान दौऱ्यासाठीही निवडण्यात आले आहे. शांभवीचे हे कार्य लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

Published on: Nov 12, 2026 08:02 PM

Follow Us