मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मदर डेअरी पाठोपाठ आता अमूलनेही दुधाच्या दरात प्रति लिटर दोन ते चार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. पशुखाद्य आणि पॅकेजिंगच्या वाढलेल्या खर्चाचे कारण देत कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर मोठा परिणाम होणार असून, चहा-कॉफीच्या दरांमध्येही वाढ अपेक्षित आहे.
देशातील आघाडीची दूध उत्पादक कंपनी अमूलने आपल्या विविध प्रकारच्या दुधाच्या दरात प्रति लिटर दोन ते चार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हे नवीन दर आजपासूनच देशभरात लागू झाले आहेत. या दरवाढीमुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक आर्थिक झटका बसला आहे. कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, पशुखाद्य आणि पॅकेजिंग साहित्याचा खर्च वाढल्याने हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठीच दूध दर वाढवल्याचे अमूलने म्हटले आहे. अमूल गोल्ड चार रुपयांनी तर अमूल ताजा प्रति लिटर दोन रुपयांनी महागणार आहे. दुधाच्या प्रकारानुसार दरवाढ वेगवेगळी असणार आहे. या दरवाढीचा थेट परिणाम रोजच्या घरगुती बजेटवर होणार आहे. विशेषतः दररोज चहा, कॉफी, लहान मुलांसाठी आणि इतर गरजांसाठी अमूलचं दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांना आता अधिक पैसे मोजावे लागतील. याआधी मदर डेअरीनेही दुधाच्या दरात वाढ केली होती, त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.
Published on: Nov 12, 2026 06:29 PM
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...

