AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!

MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!

| Updated on: Nov 12, 2026 | 6:19 PM
Share

मुंबईतील बाणगंगा परिसरात छठपूजेच्या आयोजनाला मनसेने तीव्र विरोध केला आहे. प्रदूषण आणि उत्तर भारतीयांचे शक्ती प्रदर्शन यावर मनसेने आक्षेप घेतला आहे. प्रशासनालाही त्यांनी प्रश्न विचारले आहेत, तर भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्यावर उत्तर प्रदेश निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे.

मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा परिसरात छठपूजेच्या आयोजनावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र विरोध दर्शवला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी छठपूजा होऊ देणार नाही अशी घोषणाबाजी करत आपला पवित्रा स्पष्ट केला आहे. या विरोधामागे अनेक कारणे मनसेने पुढे केली आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी बाणगंगेतील मृत माशांच्या घटनेवरून पाणी प्रदूषणाचा मुद्दा समोर आला होता. या घटनेसाठी छठपूजेसारख्या विधींना मनसेने जबाबदार धरले आहे. हे त्यांचे सण आहेत, पण त्यांनी ते त्यांच्या-त्यांच्या राज्यात जाऊन करावेत, असे मनसेचे म्हणणे आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या डी वॉर्डमध्ये सहायक आयुक्तांच्या उपस्थितीत छठपूजेच्या तयारीसाठी बैठक होणार आहे, मात्र मनसेने या बैठकीला आणि आयोजनालाच विरोध केला आहे. मनसेने प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, की हिंदूंच्या गणपती व देवी विसर्जनासाठी समुद्रात आणि तलावांमध्ये निर्बंध असताना छठपूजेला मात्र परवानगी का दिली जात आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश पुंड यांनी छठपूजा रोखण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सध्या बाणगंगा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून, तणावपूर्ण शांतता आहे.

Published on: Nov 12, 2026 06:19 PM

Follow Us