AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या निर्णयावरून नवा वाद!

मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या निर्णयावरून नवा वाद!

| Updated on: Nov 12, 2026 | 5:17 PM
Share

मध्य रेल्वेने मुंबईतील हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवण्यास सुरुवात केली आहे. लोकलच्या उद्घोषणा थांबवून मोठ्या आवाजात गाणी लावल्याने स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीसह अनेकांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे मराठी-अमराठी वाद उफाळला असून, मराठी भाषकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करून हा नवा वाद निर्माण झाल्याची टीका होत आहे.

मध्य रेल्वेने मुंबईतील हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांवर छठपूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवण्यास सुरुवात केली आहे. वडाळा, सानपाडा आणि आंबेवली स्थानकांवर ही गाणी वाजवली जात असल्याचा आरोप स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीने केला आहे. रेल्वेच्या या कृतीमुळे मराठी-अमराठी वादाला तोंड फुटले असून, मराठी भाषकांकडून संताप व्यक्त होत आहे. उत्तर भारतीयांना खूश करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

विशेषतः, लोकलच्या उद्घोषणा थांबवून मोठ्या आवाजात ही गाणी वाजवली जात आहेत, यावर आक्षेप घेण्यात आला आहे. १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान छठपूजा होणार असली तरी, मध्य रेल्वेने भाऊबीजेपासूनच याची तयारी करत गाणी वाजवायला सुरुवात केल्याचे समोर आले आहे. प्रवाशांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करून रेल्वेने हा वादग्रस्त निर्णय घेतल्याची टीका होत आहे. वर्षानुवर्षे लोकल उशिराने धावणे, अपुरे डबे, रखडलेले प्रकल्प, अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि वाढती गुन्हेगारी यांसारख्या समस्या सोडवण्याऐवजी रेल्वेने नवा वाद निर्माण केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Published on: Nov 12, 2026 05:17 PM

Follow Us