AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanyogita Bhave : डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी, ऑपरेशन नंतर इन्फेक्शन झालं अन्…’लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीनं केलेला कॅन्सरचा सामना; सांगितला कठीण काळ

Sanyogita Bhave On Cancer : 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम संयोगिता भावे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या कॅन्सर जर्नीबद्दल सांगितलं आहे.

Sanyogita Bhave : डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी, ऑपरेशन नंतर इन्फेक्शन झालं अन्...'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीनं केलेला कॅन्सरचा सामना; सांगितला कठीण काळ
| Updated on: Nov 13, 2026 | 2:51 PM
Share

मराठी अभिनेत्री संयोगिता भावे सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम‘ या मालिकेमध्ये वसू आत्याची भूमिका साकारत आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलंय. नुकत्याच एका मुलाखतीत संयोगिता भावे यांनी त्यांच्या कॅन्सर जर्नीबद्दल सांगितलं आहे. संयोगिता भावे म्हणाल्या की, ‘माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर होता. त्यानंतर तिला लिम्फोमा झाला. दुर्देवानं तिला वाचवता आलं नाही. ती माझ्यासाठी सर्व काही होती. त्यामुळे ती नाही हे सहनच होत नव्हतं.

संयोगिता यांनी सांगितला प्रसंग

‘आईला ब्रेस्ट कॅन्सर असल्यामुळे मला डॉक्टरांनी सेल्फ चेक कसं करायचं हे सांगितलं होतं. ते मी करत होते. मार्च २०१८मध्ये मला छोटीशी गाठ लागली होती. मी एफिनिटी (वन नीडल टेस्ट) केली…पण तेव्हा ती गाठ नॉन कॅन्सरस होती. पण, जानेवारी फेब्रुवारी २०१९ ला मला डाव्या ब्रेस्टमध्ये बऱ्यापैकी गाठी लागायला लागल्या होत्या आणि मला कळत नव्हतं की, ते फायब्रॉइड आहे की नेमकं काय आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की, तू मॅमोग्राम कर. नोव्हेंबरमध्ये मी मॅमोग्राम केला तेव्हा लक्षात आलं की क्लस्टर आहे. सोळा छोटे छोटे नोड होते. वन नीडल टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आली. सेकंदभर हल्ले होते. कारण, सगळं समोर दिसत होतं. ऑपरेशन करायचं ठरलं तर काम थांबणार, ट्रीटमेंट त्याचे साइड इफेक्ट्स. त्यानंतर आम्ही सेकंड ओपिनियन घेतलं. त्यानंतर पेट स्कॅन केल्यावर कळलं की, कॅन्सर अजून पसरलेला नाहीये. मग लगेचच ऑपरेशन करायचं ठरलं.’

‘अख्ख्या हॉस्पिटलला कळलं होतं की, मराठी मालिकेत काम करणारी अभिनेत्री आलीये. त्या अवस्थेत लोक फोटो काढायला यायचे. मी वेगळ्याच मेंटल स्टेटमध्ये होते. ऑपरेशनला गेल्यानंतर मला अनेस्थेशिया दिला, तेव्हा मी श्रीराम जय राम जय जय रामचा जप सुरू केला. कधी ऑपरेशन झालं ते कळलंही नाही. जेव्हा मी शुद्धीवर येत होते तेव्हा मी फक्त दोन वाक्य म्हणत होते की, मी बरी आहे तुम्ही कसे आहात? आणि मला वाटतं यामुळे मला खूप फायदा झाला. पण, ऑपरेशन झालं त्यानंतर मला इन्फेक्शन झालं होतं. त्यामध्ये परत 20 दिवस गेले. त्यानंतर मग किमो थेरेपी सुरू झाली. २१ दिवसांच्या अंतराने ६ किमो होते. पहिल्या किमोनंतर डाएट सांगितलं. रोज 4 अंडी, ड्रायफ्रुट्स, कच्च खायचं नव्हतं. पण, मी व्हेजिटेरियन होते. कधीतरी एक अंड खायचे, आता रोज ४ खावी लागत होती. पण, किमो ड्रग्जमुळे प्रोटीन वाढवायची आवश्यकता असते. ते डॉक्टर्स, नर्सेस खूप काळजी घ्यायच्या. डॉक्टर गप्पा मारायला यायचे. त्यांना सुरुवातीला माहीत नव्हतं की मी कोणी आहे. नंतर, त्यांना कळलं की मी अभिनेत्री आहे. मग येऊन ते गप्पा मारत बसायचे.’ असं संयोगिता यांनी शेवटी सांगितलं. ‘सोनचाफार प्रोडक्शन‘ला दिलेल्या मुलाखतीत संयोगिता बोलत होत्या.

Follow Us
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही
NCP Merger : पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान पुण्यात राजकीय खलबतं
सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?