AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक येथे धरणात आंघोळीला गेलेल्या बाप आणि दोन चिमुकल्या लेकींचा बुडून मृत्यू

नाशिक येथे धरणात आंघोळीसाठी गेलेल्या बापलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात ही घटना घडली आहे.

नाशिक येथे धरणात आंघोळीला गेलेल्या बाप आणि दोन चिमुकल्या लेकींचा बुडून मृत्यू
Nashik
| Updated on: Nov 11, 2026 | 5:16 PM
Share

नाशिक येथील बेझे धरणात आंघोळीसाठी गेलेल्या वडील आणि दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात ही घटना घडली आहे. बेझे धरणाच्या लगत राहत असलेल्या एका कुटुंबाकडे दिवाळी सणानिमित्त पाहुणे म्हणून आलेली मंडळी धरणात आंघोळीसाठी गेली होती. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने वडील आणि दोन लहान लेकींचा बुडून मृत्यू झाला आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात बेझे धरणाच्या लगत राहात असलेल्या उत्तम चव्हाण यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेले एकाच कुटुंबातील तीन जण आंघोळीसाठी गेले होते. आंघोळीसाठी ते धरणाच्या पाण्यात उतरले असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि दोन्ही मुलींसह वडील पाण्यात बुडाले. सुरेश नामदेव भोर (वय ४२ वर्ष), ज्योती सुरेश भोर (वय १० वर्ष )आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७ वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसली आहे.

बेझे धरणात सकाळी आंघोळीसाठी सुरेश नामदेव भोर ( ४२ ) आपल्या दोन चिमुकल्या लेकींसह गेले होते. त्यावेळी त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही, तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. या वेळी त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास त्रंबकेश्वर पोलीस करत आहेत.

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान