AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रकुटच्या गाढव बाजारात या अभिनेत्याच्या नावाच्या गाढवाची 72 हजार रुपयांना विक्री, अभिनेता म्हणाला…

चित्रकूटच्या गाढव बाजारात या बॉलिवूड अभिनेत्याच्या नावाची तुफान चर्चा. अभिनेत्याच्या नावाने गाढवाची लागली 72 हजार रुपयांपर्यंत बोली. अभिनेत्याने देखील खास प्रतिक्रिया.

चित्रकुटच्या गाढव बाजारात या अभिनेत्याच्या नावाच्या गाढवाची 72 हजार रुपयांना विक्री, अभिनेता म्हणाला...
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 11, 2026 | 5:04 PM
Share

मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे भरणारा प्रसिद्ध गाढवांचा मेळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मेळ्यात देशभरातून व्यापारी मोठ्या संख्येने गाढवे विक्रीसाठी घेऊन येतात. विशेष म्हणजे, या मेळ्यात गाढवांना बॉलिवूड कलाकारांची नावे देण्याची अनोखी परंपरा आहे. यंदा अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांसारख्या कलाकारांच्या नावांबरोबरच अभिनेता चंकी पांडे याच्या नावाने एका गाढवाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, या गाढवाची तब्बल 72 हजार रुपयांना विक्री झाली.

चित्रकूटच्या गाढवांच्या मेळ्यात यंदा चंकी पांडे नावाच्या गाढवाची सर्वाधिक चर्चा झाली. या गाढवाची बोली 72 हजार रुपयांपर्यंत पोहोचली. त्यामुळे ते मेळ्यातील सर्वात महागडे गाढव ठरले. व्यापारी आपल्या गाढवांना वेगळी ओळख मिळावी आणि ग्राहकांचे लक्ष वेधले जावे यासाठी बॉलिवूड कलाकारांची नावे देतात. यंदा चंकी पांडे नावाच्या गाढवाने याच परंपरेमुळे विशेष प्रसिद्धी मिळवली.

चंकी पांडेनेही दिली प्रतिक्रिया

आपल्या नावावर गाढवाचे नाव ठेवल्याची बातमी अभिनेता चंकी पांडे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना त्यांनी ही आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे सांगितले.

अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या जवळपास 30 वर्षांपासून ते या प्रकाराबद्दल ऐकत आहेत. त्यांच्या मित्रांनीही त्यांना या मेळ्याशी संबंधित बातम्यांच्या क्लिपिंग पाठवल्या आहेत. ही काही नवीन गोष्ट नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बर्गरलाही दिले आहे चंकी पांडेचे नाव!

चंकी पांडे यांनी सांगितले की, केवळ गाढवांनाच नाही तर अनेकदा न्हाव्याच्या दुकानांमध्येही चित्रपट कलाकारांची नावे आणि त्यांच्या हेअरस्टाइलचा वापर जाहिरातीसाठी केला जातो. एवढेच नाही, तर एका बर्गर जॉइंटमध्ये ‘चंकी पनीर पांडे’ नावाचा बर्गरही मिळतो. त्यामुळे आपल्या नावाशी जोडल्या जाणाऱ्या अशा अनोख्या गोष्टींकडे अभिनेता सकारात्मक आणि विनोदी दृष्टिकोनातून पाहतात.

चार दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय

चंकी पांडे गेल्या जवळपास चार दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विनोदी तसेच गंभीर स्वरूपाच्या भूमिका साकारल्या आहेत. आगामी काळात ते ‘हिरो की हिरोइन’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटातून यशवर्धन आहुजा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून, दिग्दर्शनाची जबाबदारी साजिद खान सांभाळत आहेत.

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान