AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?

ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 11, 2026 | 5:30 PM
Share

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना मानत पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिले होते. या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

आजच्या सुनावणीनंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली. कपिल सिब्बल यांनी पुन्हा वेळ मागितल्याचा दावा त्यांनी केला. म्हस्के म्हणाले, “कपिल सिब्बल 1 तास उशीरा आले. ते पुन्हा अशीच वेळ मागतील. कायम भावनिक वातावरण तयार केलं जातंय. आजच्या सुनावणीत नवीन काही दिसलं नाही.”

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी संपली आहे. कपिल सिब्बल यांनी आगामी सुनावणीतही आपला युक्तिवाद मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली आहे. आणखी काही मुद्दे मांडायचे असल्याचे त्यांनी सांगितले. आता शिंदे गटाच्या युक्तिवादापूर्वी सिब्बल यांना आणखी वेळ मिळतो का, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेना नेमकी कुणाची, याचा अंतिम निर्णय काय येणार, याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे.

Published on: Aug 11, 2026 05:30 PM

Follow Us