AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत अग्नितांडव, 2 जणांचा मृत्यू तर 6 जखमी, 12 मजली इमारतीला भीषण आग..

काल रात्री मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली. मुंबईत भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा जीव गेला तर अन्य लोक जखमी आहे. अग्निशमन दलाच्या जवान देखील या आगीला रोखण्याचा प्रयत्न करत असताना जखमी झालेत.

मुंबईत अग्नितांडव, 2 जणांचा मृत्यू तर 6 जखमी, 12 मजली इमारतीला भीषण आग..
Mumbai Fire
| Updated on: Aug 12, 2026 | 7:11 AM
Share

मुंबईतील विले पार्ले पश्चिम येथील चर्च रोडजवळील एका इमारतीला काल रात्री 10 च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची पातळी लेव्हल-2 होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, ही आग नक्की कोणत्या कारणाने लागली हे अद्याप कळू शकले नाही. विले पार्ले येथील शांता भुवन येथील इमारतीला आग लागली हाती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून या आगीवर रात्री उशिरा नियंत्रण मिळवले. इमारतीच्या 11 व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1101 आणि 1102 मधील सुमारे 4000 चौरस फूट क्षेत्रातील आग लागली होती.  इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, एसी युनिट, घरातील वस्तू, सोफा, पलंग, फॉल्स सीलिंग, स्वयंपाकघरातील भांडी यात जळून खाक झाली आहे. आगीचा मोठा भडका उडाला होता.

या आगीत एकूण 8 जण जखमी झाल्याचे माहिती आहे. त्यापैकी दोघांना कूपर हॉस्पिटलमध्ये आणि 6 जणांना नानावटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. घरात 6 जखमी आढळले असून, त्यापैकी 2 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे, उर्वरित चार जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतंय. या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळतंय.

यामध्ये अबीर 2.5 वर्षे, मृत घोषित, अंकिता 23  वर्षे, मृत घोषित, पार्थ 32 वर्षे प्रकृती स्थिर, हिरेन 64 वर्षे प्रकृती स्थिर, यशस्वी 33 वर्षे प्रकृती स्थिर. उपचार करून घरी सोडण्यात आले. अभिषेक प्रकृती स्थिर. उपचार करून घरी सोडण्यात आले. या आगीत दोन अग्निशमन जवान देखील जखमी झाले आहेत. मनोज सोनावणे फायरमन पुरुष 30 वर्षे उपचार करून घरी सोडण्यात आले.

शिवम द्विवेदी, पुरुष 29 वर्षे किरकोळ जखमी उपचार करून घरी सोडण्यात आले. या आगीबाबत अधिकची माहिती अशी की, आगीची ही घटना ग्राउंड प्लस 12 मजली इमारतीत घडली. मुंबई अग्निशमन दलाने रात्री 10.08 वाजता या घटनेला लेव्हल-1 घोषित केले. त्यानंतर रात्री 10.16 वाजता आगीची तीव्रता वाढल्याने लेव्हल-2 करण्यात आली. मुंबई अग्निशमन दलाला रात्री 10.02 वाजता आगीची माहिती मिळाली होती.रात्री 10.26 वाजता घटनेबाबत अपडेट जारी करण्यात आले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?