AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? कुठं शिजतोय कट? काय कारस्थान, उद्धव आणि राज ठाकरेंनी सांगितला तो प्लॅन…

Uddhav Thackeray Raj Thackeray Joint interview: मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असा दावा पुन्हा ठाकरे बंधुंनी संयुक्त मुलाखतीत केला आहे. कालही हा मुद्दा समोर आला होता. तर आजही याविषयीचे मोठे भाष्य दोन्ही बंधुंनी केले. त्यांनी हे कारस्थान कुठं शिजतंय आणि कोण हे कारस्थान रचतंय याविषयीचा मोठा दावा केला आहे.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? कुठं शिजतोय कट? काय कारस्थान, उद्धव आणि राज ठाकरेंनी सांगितला तो प्लॅन...
उद्धव ठाकरे, राज ठाकरे
| Updated on: Jan 09, 2026 | 10:26 AM
Share

Uddhav Thackeray Raj Thackeray Joint interview: मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा दावा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केला. गेल्या काही दिवसातील दाखलेही त्यांनी साठी दिले. मुंबईसह महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा प्रयोग ही एक चाचपणी होती की मराठी माणूस झोपला आहे की जागी आहे यासाठी ही चाचपणी करण्यात आल्याचे राज ठाकरे म्हणाले. त्याचवेळी मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही मुंबई वेगळी करण्याचे कारस्थान सुरु असल्याचा दावा दोन्ही बंधुंनी केला. मुख्यमंत्र्यांच्या चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई कोणीही तोडू शकणार नाही या दाव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.

मुंबई तोडण्याचे कारस्थान दिल्लीत

या मुलाखतीत दोन्ही बंधुंनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सुरु असल्याचा पुन्हा दावा केला. कालही त्यांनी असाच दावा केला होता. तर यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई आणि आजूबाजूचा परिसर वेगळा करण्याचे कारस्थान सुरु असल्याचा दावा केला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान दिल्लीत सुरू आहे. त्यामुले मुख्यमंत्री फडणवीस इकडे काय बोलतात त्याला महत्त्व नाही. वर दोघेजण बसलेत त्यांच्या मनात वेगळेच आहे असा दावा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत केला.

मुख्यमंत्र्‍यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार

सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सडतोड मत मांडलं. राज ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाही. त्यांची इच्छा चांगली आहे. पण जे वरून म्हणजे दिल्लीतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची, तर त्यांच्यासमोर सही करण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे वरंच्यांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही. Obey the Order एवढीच फक्त गोष्ट त्यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांनी चंद्र-सूर्याचे कितीही दाखले दिले तरी वरती जे बसलेले आहेत, मोदी आणि शहा त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय असे राज ठाकरे म्हणाले.

तर मुळात मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जात आहे हे चिंताजनक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कोणीही येतो आणि सांगतो या भागाची भाषा गुजराथी आहे. आमच्यावर हिंदीची सक्ती करणार. म्हणजेच तुम्ही आमची सगळीच अस्मिता व संस्कृती मारणार आणि केवळ नावालाच मुंबई महाराष्ट्रात ठेवणार का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

यावेळी मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात सुरु असलेल्या विकास कामांमागे काय सुप्त हेतू आहे यावरही दोन्ही बंधूंनी भाष्य केले. वाढवण बंदर आणि नवीन मुंबई विमानतळाविषयी राज ठाकरे यांनी भाष्य केलं. तर पालघर, ठाणे परिसरात सुरु असलेल्या विविध विकास योजना या मराठी माणसांसाठी आहेत की इतर कुणासाठी याबाबत ठाकरे बंधुंनी मोठे भाष्य केले. हा भाग गुजरातच्या जवळ असल्याने तिकडे हे उद्योग सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.