AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला असताना मोठे संकट उभे आहे. ज्याचा थेट फटका भारताला बसत आहे. भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे. जर हे युद्ध अधिक काळ चालले तर भारतासह अन्य देश अडचणीत येऊ शकतात.

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..
Strait of Hormuz Oil tanker
| Updated on: Jul 22, 2026 | 1:20 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यामध्येच होर्मुज खाडी बंद करण्यात आली. आता यानंतर मोठा दणका भारतासह चीनला बसला. होर्मुज खाडीनंतर दुसरा महत्वाचा जागतिक सागरी मार्गही ठप्प झाला. ज्यामुळे तणाव अधिक वाढला असून मोठे संकट उभे आहे. येमेनमधील इराणसमर्थक हूती बंडखोरांनी भारत आणि चीनच्या दिशेने येणाऱ्या तेलवाहू जहाजांना मोठी धमकी दिली. ज्यामुळे या जहाजांना अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परतावे लागले. या युद्धात आता दुसरे एक मोठे संकट उभे आहे. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे खंडीत होण्याची भीती आहे. भारतासह अन्य देशांना या युद्धाचा मोठा फटका बसताना दिसतोय. जर स्थिती अशीच राहिली तर भारतामध्ये महागाईचा मोठा भडका उडेल.

साैदी अरेबियाच्या यान्बू बंदराहून हे जहाज कच्चे तेल घेऊन निघाले होते. एक जहाज भारताकडे तर एक जहाज चीनकडे निघाले होते. मात्र, हूती बंडखोरांनी साैदीहून ये-जा करणाऱ्या जहाजांना धमकी दिली. ज्यामुळे अर्ध्या रस्त्यातून हे जहाज माघारी फिरले. सुएझ कालव्याच्या दिशेने हे जहाज वळली. या जहाजांना खूप जास्त मोठे वळण घेऊन यावे लागते. ज्यामुळे खर्च अधिक होतो.

मुळात म्हणजे होर्मुज खाडी पूर्णपणे बंद आहे. तांबडा समुद्र आणि यान्बू पाईपलाईन हेच मार्ग आता तेल पुरवठ्यासाठी राहिली आहेत. परिस्थिती जर अशीच राहिली तर मोठे संकट उभे राहू शकते. कारण तेल पुरवठ्याकरिता खर्च वाढला आहे. भारताला याचा थेट फटका बसत आहे. भारतात महागाई वाढण्याचे मोठे संकेत आहेत.

कारण या मार्गाने तेल भारतात आणण्यासाठी मोठा खर्च आहे. सलग 11 व्या दिवशी अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला. दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनली आहे. होर्मुज खाडी लगेचच सुरू होण्याचे कोणतेच संकेत नाहीत. हूती बंडखोरांनी बाब अल मंदेल मार्ग पुर्ण बंद केला नाही पण बंडखोरांकडून जहाजांना धमक्या दि्ल्या जात आहेत.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी