AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

70च्या दशकातील ‘अपशकुनी’ गझल! ज्यांनी गायली-लिहिली त्यांचा झाला मृत्यू; आजही गायक गाण्यास घाबरतात

70 च्या दशकातील सर्वात अपशकुनी गझल, ज्याने गायली आणि लिहिली त्याचा झाला मृत्यू. आजही मोठ-मोठे गायक गाण्यासाठी घाबरतात.

70च्या दशकातील ‘अपशकुनी’ गझल! ज्यांनी गायली-लिहिली त्यांचा झाला मृत्यू; आजही गायक गाण्यास घाबरतात
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 12, 2026 | 6:19 PM
Share

गझल म्हटलं की कानावर पडतो तो सुरेल आवाज आणि मनाला मिळतो एक वेगळाच दिलासा. मात्र, एका गझलेची कहाणी ऐकली तर अंगावर काटा येतो. 70 च्या दशकात लिहिलेल्या या गझलेला ‘मनहूस गझल’ म्हणून ओळखलं जातं. विशेष म्हणजे, ही गझल गाणारे आणि लिहिणारे काही कलाकार अकाली मृत्यूमुखी पडल्याचा दावा केला जातो. त्यामुळे आजही अनेक गायक ही गझल गाणं टाळतात.

ही गझल प्रसिद्ध शायर इब्ने-इंशा यांनी लिहिली होती. ‘इंशा जी उठो अब कूच करो’ असे तिचे बोल आहेत. इब्ने-इंशा यांचा जन्म पंजाबमधील फिल्लौर येथे झाला होता. फाळणीनंतर ते पाकिस्तानात स्थायिक झाले. त्यांच्या लेखणीतून अनेक गाजलेल्या रचना निर्माण झाल्या. ‘कल चौदहवीं की रात थी’ या प्रसिद्ध गझलेचे बोलही त्यांनीच लिहिले होते.

अमानत अली यांनी गायली आणि काही महिन्यांत निधन

1974 मध्ये पटियाला घराण्याचे प्रसिद्ध गायक उस्ताद अमानत अली यांनी ही गझल पाकिस्तान टेलिव्हिजनवर गायली. त्यांच्या आवाजातील ही गझल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच अवघ्या 52 व्या वर्षी अमानत अली यांचे निधन झाले. यानंतर या गझलेभोवती ‘मनहूस’ असल्याची चर्चा सुरू झाली.

या गझलेचे लेखक इब्ने-इंशा यांनाही पुढे कर्करोगाचे निदान झाले. लंडनमधील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी आपल्या शेवटच्या पत्रांपैकी एका पत्रात अमानत अली यांची आठवण काढत या गझलेचा उल्लेख केला होता, अशी कथा सांगितली जाते. ‘ही मनहूस गझल आणखी किती जणांचे प्राण घेणार?’ असा आशय त्यांनी व्यक्त केल्याचे म्हटले जाते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाले.

अमानत अली यांच्या मुलाचाही मृत्यू

अमानत अली यांचा मुलगा असद अमानत अली यांनीही एका कार्यक्रमात ही गझल सादर केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांचेही निधन झाले. त्यामुळे या गझलेशी संबंधित मृत्यूंच्या कहाण्यांना आणखी हवा मिळाली आणि गायकांमध्ये या गझलेबाबत भीती निर्माण झाली.

Follow Us
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप