AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली

Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली

| Updated on: Sep 12, 2026 | 4:00 PM
Share

वाशिम जिल्ह्यात सव्वा महिन्यापासून पाऊस नसल्याने सोयाबीन, तूर आणि कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याने आपल्या डोळ्यात अश्रू आणत व्यथा मांडली. एकरी २५ हजार रुपये खर्च करूनही काहीच हाती लागले नाही, शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वाशिम जिल्ह्यात गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, तूर आणि कपाशी या पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्याच्या कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव आणि वाशिम तालुक्यांमध्ये पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पावसाअभावी सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे भांडवल वाया गेले आहे.

मालेगाव तालुक्यातील पांढरी धनकुटे येथील एका महिला शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना डोळ्यात अश्रू आणले. चार एकर सोयाबीन पेरणीसाठी एकरी २५ हजार रुपये खर्च आला, मात्र आता काहीच हाती लागणार नाही अशी त्यांची भावना आहे. लेकराबाळांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने तातडीने एकरी २५ हजार रुपये किंवा हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Published on: Sep 12, 2026 04:00 PM

Follow Us