विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत सरकारनं ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे. जरांगे पाटलांची तब्येत खालावत असून सरकारनं लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याची गरज आहे. डीजे बंदी आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाशी संबंधित प्रकरणांवरही त्यांनी भाष्य केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या उपोषणाबाबत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते विनायक राऊत यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जरांगे पाटलांची तब्येत खालावत चालली असून, सरकारनं त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी राऊत यांनी केली. राऊत यांच्या मते, मराठा आरक्षणाबाबत सरकारनं नेमकी काय भूमिका घ्यायची हे स्पष्ट करून, जरांगे पाटलांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि लवकरात लवकर त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. “या सातत्याने होत असलेल्या उपोषणामुळे मनोज जारंगेंची तब्येत ही खूप खलावत चाललेली आहे, हे महाराष्ट्रासाठी योग्य नाहीये,” असे राऊत म्हणाले. याव्यतिरिक्त, ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासही राऊत यांनी विरोध दर्शवला. कोणत्याही समाजाला मिळालेल्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजासाठी स्वतंत्र तोडगा काढण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली. सरकारने डीजे बंदीबाबत धोरण स्पष्ट करावे आणि जुने प्रकरणे उकरून काढू नयेत, असेही ते म्हणाले.
Published on: Sep 12, 2026 03:01 PM
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश

