AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sky Train : अबब…चक्क हवेत उलटी लटकून धावते ट्रेन, लोको पायलटही नसतो; Video व्हायरल

China Sky Train Video : चीनने अशी एक ट्रेन बनवली आहे, जिची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. या रेल्वेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या ट्रेनबद्दल जाणून घेऊयात..

Sky Train : अबब...चक्क हवेत उलटी लटकून धावते ट्रेन, लोको पायलटही नसतो; Video व्हायरल
China Sky TrainImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 6:23 PM
Share

जेव्हा जेव्हा रेल्वेचा विचार केला जातो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये रुळ येतात. काही चांगले स्टेशन्स आठवतात. फारफार तर आपल्याला लोकल, मेट्रो ट्रेनचीही आठवण येऊ शकते. पण आता अशी एक ट्रेन आली आहे. जी जमिनीवरच्या रुळावरुन चालत नाही तर थेट हवेत चालते. होय कारण की दूरून पाहिल्यावर ही रेल्वे अक्षरः हवेत उलटी लटकलेली दिसू लागते. हवेतच ती पुढे चालत राहते त्यामुळे या ट्रेनला आता स्काय ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. त्याचं कारण ही ट्रेन जमिनीपासून 33 फूट वर म्हणजेच 10 मीटर वर मॅग्नेटिक म्हणजेच चुंबकीय रुळावरुन धावते.

चीनने बनवलेली ही ट्रेन चालवण्यासाठी चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामळे ती सामान्य रेल्वेपेक्षा वेगळी ठरते. तुम्ही जर तिला पहिल्यांदा पाहिलं तर असं वाटतं की ही ट्रेन काही भाग रुळाखाली आहे आणि ती हवेत तरंगल्यासारखी भासू लागते.

ही स्काय ट्रेन नेमकी कशी चालते?

थोडक्यात सांगायचे तर ही रेल्वे रुळ यांच्यामध्ये एक चुंबकीय उर्जा तयार करते आणि त्यानंतर हवेतील रुळावरुन धावायला लागते. चीनने या ट्रेनसाठी 2600 फूट लांबीचा एक रेल्वे मार्ग तयार केला आहे. या रेल्वेच्या वेगाबद्दल सांगायचं झाल्यास ताशी 60 किलोमीटर प्रमाणे ही धावते. या ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे ती अत्यंत शांतपणे कोणताही आवाज न करता धावेल असा पद्धतीने तिची रचना करण्यात आलेली आहे.

प्रवासी क्षमता

ही स्काय ट्रेन एकावेळी 200 प्रवाशांना घेऊन जाऊ शकते. खास बाब म्हणजे या रेल्वेला चालवण्यासाठी लोको पायलटचीही आवश्यकता पडत नाही. म्हणजे चालक असतो पण त्याची आवश्यकता आपात्कालिन परिस्थितीच गरज पडते, अन्यथा ही गाडी पूर्णपणे स्वयंचलित आहे.

तसेच ट्रेनमध्ये उर्जा कमी करणारे तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे उर्जेचा वापर 15 टक्के कमी झाल्याचा दावा केला जातो. दरम्यान, या रेल्वेच्या निर्मितीमागचा उद्देश केवळ प्रवासी वाहतूक नसून पर्यटनही आहे. वुहान शहरातल्या सुंदर पर्यटनस्थळांचे विहंगम दृश्य पाहता यणे या ट्रेनमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे आता पर्यटक ट्रेनमधून दिसणाऱ्या खालच्या परिसराला अनुभवण्याचा वेगळा अनुभव घेऊ शकतात. दिवसेंदिवस आता या ट्रेनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी