AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSP Party : मायावती यांचा उत्तराधिकारी ठरला? आता नवं नाव समोर; बसपा पक्ष कात टाकणार?

मी अविवाहित असल्याने माझ्या सुरक्षेसाठी मी कुटुंबातील सदस्यांना सोबत ठेवते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आता आनंद कुमार यांच्या मुलांना बीएसपीमध्ये राजकारण करण्याची संधी दिली जाणार नाही, असे यावेळी मायावती यांनी स्पष्टपणे सांगितले.

BSP Party : मायावती यांचा उत्तराधिकारी ठरला? आता नवं नाव समोर; बसपा पक्ष कात टाकणार?
bsp and mayavatiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 12, 2026 | 6:18 PM
Share

BSP Party And Mayawati : उत्तर प्रदेशच्या राजकारणात बहुजन समाज पार्टी म्हणजेच बीएसपी पक्षाचे वेगळे स्थान आहे. हा पक्ष कधीकाळी सत्तेत होता. त्या काळात बीएसपीच्या प्रमुख मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. आता हा पक्ष सत्तेत नसला तरीही मायावती आणि त्यांच्या पक्षाला मतदान करणारा मोठा वर्ग आहे. दरम्यान, या पक्षाने पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एकीकडे बीएसपी हा पक्ष निवडणुकीची तयारी करत असताना आता मायावती यांचा उत्तराधिकारी कोण, अशी चर्चा रंगली आहे. अगोदर भाऊ आनंद कुमार यांचे पुत्र आकाश आणि इशान यांच्याकडे पक्ष सोपवला जाऊ शकतो, असं बोललं जात होतं. परंतु त्या दोघांनाही संधी दिली जाणार नाही, अशी चर्चा रंगली आहे. असे असतानाच आता या पक्षाच्या नव्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा रंगली आहे.

आमच्या पक्षात घराणेशाहीला थारा नसेल- मायावती

मिळालेल्या माहितीनुसार आनंद कुमार यांची मुलगी दीपिका आनंद यांच्याकडे बीएसपी पक्षाच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. भविष्यात त्याच बसपा पक्षाचे नेतृत्त्व करू शकतात, असा तर्क लावला जातोय. मायावती यांनी एक्स या सोशल मीडिया मंचावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आमच्या पक्षात घराणेशाहीला थारा नसेल असे सांगितले. माझे पूर्ण लक्ष हे बहुजन समाजाचे हित, कल्याण याकडे आहे. काशींराम यांच्याप्रमाणेच मीदेखील माझ्या कुटुंबातील भाऊ-बहीण, तसेच कुटुंबातील तरुण सदस्यांना पक्षापासून अंतरावरच ठेवलेलं आहे. मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना मंत्री, आमादर, खासदार तसेच राजकीय पद दिलेले नाही, असे मायावती यांनी स्पष्ट केले.

मायावती यांचा उत्तराधिकारी कोण?

मी अविवाहित असल्याने माझ्या सुरक्षेसाठी मी कुटुंबातील सदस्यांना सोबत ठेवते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आता आनंद कुमार यांच्या मुलांना बीएसपीमध्ये राजकारण करण्याची संधी दिली जाणार नाही, असे यावेळी मायावती यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी मायावती यांनी आनंद कुमार यांची मुलगी दीपिका आनंद यांच्याविषयी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. दीपिका सध्या वकिलीचे शिक्षण घेत आहेत. दीपीका यांचा प्रामाणिकपणा त्यांची कार्यक्षमता पाहून भविष्यात त्यांना पक्षात जबाबदारी दिली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मायावती यांची उत्तराधिकारी दीपिका आनंद या असतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप