AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mallikarjun Kharge: मोदींच्या वडिलांबाबतच्या विधानावरून राजकीय रणकंदन; खर्गेविरोधात तक्रार, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर, सांगितलं…

Mallikarjun Kharge News: पाटणाच्या कोतवाली पोलीस ठाण्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पाटणा येथील एका कार्यक्रमात पंतप्रधानांच्या वडिलांविषयी वक्तव्य केले होते.

Mallikarjun Kharge: मोदींच्या वडिलांबाबतच्या विधानावरून राजकीय रणकंदन; खर्गेविरोधात तक्रार, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर,  सांगितलं...
| Updated on: Oct 25, 2026 | 10:43 PM
Share

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात पाटणाच्या कोतवाली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच भाजपने उद्या देशभर आंदोलनाची हाक दिली आहे. अनेक काँग्रेस नेते या प्रकरणी स्पष्टीकरण देऊन मल्लिकार्जुन खर्गे यांचा बचाव करत आहेत. यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी समिती सदस्य कृष्ण सिंह कल्लू यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे .

या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध अपमानास्पद आणि असभ्य भाषा वापरली. भाजपने सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा पुतळा जाळण्याची योजनाही जाहीर केली आहे. पक्ष २६ ऑक्टोबर रोजी सकाळी पाटण्यातील आयकर मंडळाजवळ खर्गे यांचा पुतळा जाळणार आहे.

मल्लिकार्जुन खर्गे पाटणा दौऱ्यावर असून एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, एसआयआर घोटाळ्यात सामील असलेल्यांना तुरुंगात पाठवले जाईल. त्यावर एका व्यक्तीने उत्तर दिले, मोदी जाणार नाहीत. त्यावर खर्गे म्हणाले, “मोदींचे वडीलही जातील.” या वादावर काँग्रेस पक्षाने प्रतिक्रिया दिली असून भाजपवर पलटवार केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस खासदार पवन खेरा म्हणाले, आरएसएस आणि भाजपच्या सदस्यांनी खर्गे यांना वाईट वागणूक देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी उत्तराखंडमध्ये दलित असल्यामुळे त्यांच्यावर तथाकथित शुद्धीकरण विधी करण्यात आला होता. खर्गे बिहारमध्ये भाषण देत असताना एका भाजप कार्यकर्त्याने उद्धटपणे ओरडून म्हटले, तुमचे वडील आले तरी मोदी कुठेही जाणार नाहीत. एका ज्येष्ठ नेत्याविरुद्ध अशा अपमानजनक भाषेला प्रत्युत्तर देताना खर्गे यांनी आरएसएस आणि मोहन भागवत यांचा संदर्भ देत म्हटले की, मोदी नक्कीच जातील आणि त्यांचे वैचारिक वडीलही जातील.

खेरा यांनी आरोप केला की, हे सर्व मोदी आणि शाह यांच्या थेट सांगण्यावरून घडत असून, देश त्यांना कधीही माफ करणार नाही. काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी खर्गे यांचा बचाव करत म्हटले, यात आक्षेपार्ह असं काय आहे? भाषण सुरू असताना कोणीतरी ओरडत होतं. ही बोलण्याची एक पद्धत आहे. त्याचा देव किंवा त्याचे वडीलही जातील, असं म्हणणं हा काही अपमान नाही. हा अपमान खुद्द पंतप्रधानांनीच सुरू केला. पंतप्रधान स्वतःच ५० कोटी रुपयांची प्रेयसी, जर्सी गाय आणि मंगळसूत्र हिसकावून घेण्यासारखी वक्तव्ये करतात. भारताच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानाने अशी भाषा वापरलेली नाही. पंतप्रधान जेव्हा अशा गोष्टी बोलतात, तेव्हा भाजपचे सदस्य पूर्णपणे गप्प का बसतात?”

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत