Uddhav Thackeray: मुंबईवर कब्जा करण्यापेक्षा आधी अहमदाबादचं नामांतर करा, उद्धव ठाकरेंनी डिवचले
Uddhav Thackeray Raj Thackeray Joint interview: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीची कालपासून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. आज या मुलाखतीचा दुसरा भाग समोर आला. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी अहमदाबादवरून भाजपला डिवचलं.

Uddhav Thackeray Raj Thackeray Joint interview: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीची कालपासून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही बंधु एकत्र आल्यापासून भाजपवर कडाडून हल्ला केला. काल मुलाखतीचा पहिला भाग तर आज दुसरा भाग समोर आला. यावेळी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी भाजपला यामुद्दावरून डिवचले. तर मुंबईजवळील गुजरात लागून असलेल्या परिसरात सुरू असलेल्या विविध विकास योजनांमागील हेतू आणि कारस्था्न काय यावर दोन्ही बंधुंनी मोठे भाष्य केलं. काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सोन्याची कोंबडी कापायला निघालेत
आम्ही मुंबईला आपलं शहर म्हणून बघतो, मुंबईचं नाव मुंबादेवीवरून पडलं हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणून बघताहेत आता ते कोंबडीच कापायला निघाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. फडणवीस म्हणतात, आम्ही झोपडीमुक्त करु, म्हणजेच मुंबई अदानीयुक्त करून हेच त्यांच्या विकासाचे मॉडल असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी मुंबई मराठीपासून वेगळी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्याचा आता सूड उगवल्या जात असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
यावेळी बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. मुंबईपासूनचा भुगोल नीट अभ्यासलात तर बुलेट ट्रेन कुठून कुठे चालली आहे हे लक्षात येईल असे दोघांनी सांगितले. बुलेट ट्रेनला सगळ्यांनीच विरोध केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तर बुलेट ट्रेन जिथून अहमदाबादला जाणार आहे. तो ठाणे, पालघर हा जो सगळा भाग आहे. हा सगळा तेवढा पट्टा बरोब्बर गुजरातला लागून आहे. पालघरमधल्या दोन खेड्यांवर आता गुजरात दावा सांगत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. हा धोका ओळखण्याचे आवाहन दोन्ही बंधुंनी केले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईवर कब्जा करण्यापेक्षा अहमदाबादचं नाव बदला असा चिमटा काढला. यावेळी त्यांनी मराठी माणसांना आवाहनही केलं. मराठी म्हणून या गोष्टीचा विचार करावाच लागेल. मतभेद असतील. भांडणं असतील, जे काही असेल ते मिटवा. महाराष्ट्रापुढे काहीही नाही. भाजपातील लोक असतील अथवा त्यांच्या बरोबर इतर पक्षांचे जे कोणी सहकारी लोक असतील अजून कोणी असेल. प्रत्येकानं या गोष्टीचा विचार करणे गरजेचं आहे. नाहीतर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही असं दोन्ही बंधुंनी अधोरेखित केले.
