राज ठाकरे यांचा वाढवण बंदराजवळ विमानतळ बांधण्यास विरोध? म्हणाले, विमानतळ कशासाठी…
Uddhav Thackeray Raj Thackeray Joint interview: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित झाला. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी वाढवण बंदराजवळील विमानतळाविषयी मोठे भाष्य केलं आहे. मराठी भाषिक पट्ट्यात खरंच मोठं कारस्थान सुरू आहे का?

Uddhav Thackeray Raj Thackeray Joint interview: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीची जोरदार चर्चा सुरू आहे. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित झाला. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी वाढवण बंदराजवळील विमानतळाविषयी रोखठोक मत मांडलं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे मोठे कारस्थान सुरु असल्याचे दोन्ही बंधुंनी आरोप केले आहे. त्यातील एक मोठी कडीवर राज ठाकरे यांनी प्रकाश टाकला. त्यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्राचा भाग गुजरातला जोडण्याचा प्रयत्न
यावेळी राज ठाकरे यांनी एका मोठ्या मुद्दाकडे राज्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे. या मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा पुन्हा गंभीर आरोप केला. तर राज ठाकरे यांनी मुंबईच्या जवळचा आणि गुजरातला लागून असलेल्या भागाविषयी मोठे भाष्य केले. महाराष्ट्राचा भाग गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा करत त्यांनी काही उदाहरणं दिली. यावेळी स्ट्रॅटॅजिकली मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्याला आपण एमएमआर रिजन म्हणतो, त्यात काय काय सुरू आहे, वाढवण बंदर, या बंदराला लागून विमानतळ, विमानतळ तुम्ही कशासाठी आणताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
या मुद्यावर राज ठाकरे यांनी एक मोठा इशारा दिला. मुंबईनंतर नवीन मुंबईत जे विमानतळ झालंय. मुंबईतल्या हक्काच्या विमानतळावरील सगळा कार्गो तिथे नवी मुंबईतल्या विमानतळावर हलवतील. आता सुरुवात झालेलीच आहे. पुढे हळूहळू मुंबईतील डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईत हलवणार. आताच मुंबईतील विमानतळ अदानीकडं आहेच. आताच्या विमानतळाचं क्षेत्रफळ तुम्ही पाहिलंत तर त्यात कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील इतकं मोठे ते आहे. म्हणजे उद्या डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईला हलवायचं आणि इथल्या विमानतळाचा सर्व भाग विकायाला काढायचा हा त्यांचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
अदानींचा विस्तार मोदींच्या काळात
यावेळी राज ठाकरे यांनी अजून एका बाबीवर मोठे भाष्य केले. अदानी आणि अंबानी यांच्यातील फरक त्यांनी समोर आणला. मोदी मोठे व्हायच्या आधीपासून अंबानी मोठे होते, पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झाला आहे. अदानीचा विस्तार हे मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, त्याचवेळी अदानीला मुंद्रा पोर्ट मिळाला आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानींना अनेक गोष्टी मिळाला आहेत, असे मत राज ठाकरे यांनी या संयुक्त मुलाखतीत मांडले.
यावेळी राज ठाकरे यांनी एक मोठा सवाल भाजपला केला आहे. जर देशात भाजपऐवजी काँग्रेस अथवा इतर कोणत्याही पक्षाचे सरकार असते आणि एखाद्या केंद्रात बसलेल्या सरकारने काँग्रेस अथवा इतर पक्षाने जर एकाच उद्योगपतीवर मेहरबानी केली असती तर भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे रिॲक्ट झाला असता असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. त्यांनी भाजपच्या धोरणावर मुलाखतीत गंभीर आरोप केले.
