AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितळ आणि चमकदार त्वचेसाठी तांदूळ आहे वरदान, चेहऱ्यावर अशाप्रकारे करा वापर

आजकाल प्रत्येकजण घरगूती उपायांकडे अनेकांचा कल वाढत चालेला आहे. यासाठी तुम्हाला जर चमकदार त्वचा हवी असल्यास स्वंयपाक घरात उपलब्ध असलेल्या तांदळाचा वापर करा. चला तर मग आजच्या लेखात आपण तांदूळांचा वापर चेहऱ्यावर कसा करायचा ते जाणून घ्या.

नितळ आणि चमकदार त्वचेसाठी तांदूळ आहे वरदान, चेहऱ्यावर अशाप्रकारे करा वापर
skin care tips
| Edited By: | Updated on: Mar 01, 2026 | 12:02 AM
Share

आपल्यापैकी अनेकजण त्वचेला चमकदार ठेवण्यासाठी विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात, पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे जे तुमच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. तुमच्या मनात पहिले टोमॅटो किंवा बटाट्यांबद्दल विचार आला असेल. पण हे नसून तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी तांदूळ सर्वोत्तम आहे. तांदळापासून केवळ भात खाण्याचा आनंदच वाढवत नाही तर त्वचेसाठी एक वरदान देखील आहे.

तांदूळ कसा फायदेशीर आहे?

त्यात व्हिटॅमिन ई, फेरुलिक ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि अमीनो ॲसिड असतात, जे त्वचेच्या विविध समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. तुम्हाला फक्त ते कसे लावायचे हे माहित असणे आवश्यक आहे. चला आजच्या लेखात आपण तांदळाचा वापर त्वचेवर कश्याप्रकारे करू शकतो ते जाणून घेऊयात.

टोनर म्हणून करा वापर :

तांदळापासून टोनर बनवण्यासाठी, अर्धा कप तांदूळ धुवा आणि एक कप पाण्यात भिजवा. 30 मिनिटांनंतर पाणी गाळून घ्या आणि बाटलीत भरून ठेवा. हे तयार पाणी तुमच्या त्वचेची छिद्रे घट्ट करण्यासाठी, तेल नियंत्रित करण्यासाठी आणि निस्तेजपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते.

फेस पॅक तांदळाचा वापर:

तुम्ही तांदळाच्या फेस पॅकने तुमची त्वचा एक्सफोलिएट करू शकता. तर हा फेसपॅक तयार करण्यासाठी, 2 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचा दही आणि थोडे मध एकत्र करा आणि तयार पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर हलक्या हाताने चोळा. नियमित वापरल्याने टॅनिंग, पिग्मेंटेशन आणि डाग कमी होण्यास मदत होते.

बर्फाच्या तुकड्याच्या साहाय्याने त्वचेवर लावा :

तांदळाच्या पाण्यापासून बर्फ बनवण्यासाठी, तांदळाचे पाणी एका बर्फाच्या ट्रेमध्ये टाकून फ्रीजरमध्ये ठेवा जेणेकरून बर्फाचे तुकडे तयार होतील. तांदळाच्या पाण्यापासून तयार बर्फाचे तुकडे तुमच्या चेहऱ्यावर लावण्यासाठी चेहऱ्यावर 1 ते 2 मिनिटे हळूवारपणे घासून घ्या. अशा प्रकारे तांदूळांचा वापर विविध पद्धतीने त्वचेवर केल्याने चेहऱ्यावरील छिद्रे घट्ट होतील, सूज कमी होईल आणि तुमचा रंग उजळेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी