AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी कोट्यवधींचा मालक, संपत्ती आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ!

वैभव सूर्यवंशी लहान वयात क्रिकेटमधील मोठं नाव झालं आहे. त्यामुळे त्याच्या भोवती आर्थिक वलयही तयार झालं आहे. अवघ्या 15 व्या वर्षी नामांकित ब्रँड्सने त्याच्यासोबत करार केला आहे. त्यामुळे त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये कोट्यवधींची वाढ झाली आहे.

अवघ्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी कोट्यवधींचा मालक, संपत्ती आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ!
अवघ्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी कोट्यवधींचा मालक, संपत्ती आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ!Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 12, 2026 | 1:32 AM
Share

वैभव सूर्यवंशीने वयाच्या 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याच्यावर आयपीएलमध्ये बोली लागली होती. त्यासाठी तेव्हा राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी 1.1 कोटी रुपये मोजले होते. सर्वात कमी वयात आयपीएल खेळणारा खेळाडू त्याची नोंद झाली होती. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. कमी वयात त्याने क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम नोंदवले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याचा नावलौकिक झाला. इतकंच काय तर त्याच्या चाहतची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे त्याच्या नावावर रोज नवे विक्रम प्रस्थापित होत असताना दुसरीकडे संपत्तीतही झपाट्याने वाढ झाली आहे. त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमुळे मोठमोठ्या कंपन्यांचा त्याच्याकडे ओढा वाढला आहे. कमी वयातचं कंपन्या आणि ब्रँड्स त्याचा चेहरा वापरण्यासाठी उत्सुक आहेत. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची संपत्ती आता 7 ते 10 कोटींच्या घरात असल्याचं बोललं जात आहे. चला जाणून घेऊयात त्याची संपत्ती आणि ब्रँड व्हॅल्यूबाबत…

मिडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत वैभव सूर्यवंशीला कोणत्याही मोठ्या कॉर्पोरेट कंपनीसोबत एंडोर्समेंट करार मिळालेला नाही. पण लवकरच याबाबत काही होऊ शकतं.  वैभव सूर्यवंशीला आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ब्रँडच्या जाहिरातीसाठी त्याला 1 कोटी मिळत असल्याची क्रीडा वर्तुळात चर्चा आहे. त्यानंतर आयपीएल 2026 नंतर यात दुप्पट वाढ झाली आहे. वैभव सूर्यवंशी सध्या प्रमुख पाच मोठ्या ब्रँड्स आणि संस्थांशी अधिकृतपणे जोडला गेला आहे. सरीन स्पोर्ट्स, कॉम्प्लेन, गुगल पे, रेड बुल आणि झारखंड आरोग्य विभागाकडून त्याची निवड केली गेली आहे. सरिन स्पोर्ट्सोबत एक इक्विपमेंट करार असून त्यासाठी वार्षिक अंदाजे 50 लाख रुपये मिळतात. सरिन स्पोर्ट्सने बाजारात विशेष वैभव सूर्यवंशी एडिशन बॅट्सदेखील आणल्या आहेत. दुसरीकडे, बॅटवर स्टिकर लावण्यासाठी एका मोठ्या कराराची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे.

वैभव सूर्यवंशी कॉम्प्लेनच्या “थोडा प्लॅन, थोडा कॉम्प्लॅन” या मोठ्या जाहिरात मोहिमेचा मुख्य भाग आहे. तर राजस्थान रॉयल्सचा सहकारी ध्रुव जुरेलसोबत रेड बुल चँलेजमध्ये भाग घेतला होता. त्यात 30 चेंड़ूत 60 धावा गाठायच्या होत्या. अशा ब्रँडसोबत दिसणं हा देखील व्यावसायिक भाग असतो. आयपीएलपूर्वी त्याने या कंपन्यांसोबत प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे करार केल्याचं बोललं जात आहे. गुगल पे या जाहिरातीसाठीही त्याला साधारण 1 ते 1.5 कोटी रुपये मिळाले असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, झारखंड आरोग्य विभागाकडून त्याची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. हे सरकारी पद असल्याने मानधनापेक्षा ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून मिळणाऱ्या सन्मानाला प्राधान्य दिले गेले आहे.

Follow Us
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी