Box Office: ‘रामायण’ला टक्कर देणारा सिनेमा! अचानक कमाईत वाढ, १५० कोटींच्या आसपास कमाई
Scene Box Office Day 13: गेल्या काही दिवसांपासून ‘रामायण’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. पण आता दुसऱ्या एका सिनेमाने याला चांगलीच टक्कर दिली आहे. चित्रपटाने 150 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. आता हा सिनेमा कोणाता? पाहा...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेचा ‘रामायण’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने देशभरात चांगली कमाई केली आहे. आता या सिनेमाला एका साऊथच्या सिनेमाने टक्कर दिल्याचे समोर आले आहे. या चित्रपटानेही प्रदर्शनाच्या 13व्या दिवशी 150 कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली आहे. आता सिनेमा कोणता आहे? चला जाणून घेऊया…
आम्ही साउथ सुपरस्टार सूर्याच्या ‘सीन’ या चित्रपटाविषयी बोलत आहोत. या चित्रपटात सूर्याने पुन्हा एकदा दमदार अभिनय दाखवला आहे. सूर्याच्या ‘सीन’बाबत चाहते बराच काळ उत्सुक होते. ‘करुप्पु’नंतर चाहते त्याच्या ‘सीन’ चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. हा सिनेमा ६ नोव्हेंबरला सिनेमागृहात दाखल झाला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाल केली आहे. आता ‘सीन’च्या १३व्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत. या चित्रपटाने ‘रामायण’ सिनेमाला टक्कर दिल्याचे समोर आले आहे.
वाचा: ‘रामायण’ सिनेमात रिक्षा चालकाची मुलगी, भूमिकेने चमकलं नशीब
चित्रपटाच्या कमाईविषयी
सूर्याचा ‘सीन’ रिलीज झालe त्याच वेळी ‘जेलर २’ आणि ‘रामायण’ सारखे चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांमध्येही सूर्याचा ‘सीन’ शानदार कमाई करत आहे. ‘सीन’चे दिग्दर्शन जीतू माधवन यांनी केले आहे. तमिळ स्टार सूर्याच्या चित्रपट ‘सीन’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत बोलायचे झाले तर ओपनिंग डेवर १९.१५ कोटी रुपये कमाई केली होती. अशा परिस्थितीत आता त्याच्या १३व्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. Sacnilk च्या अहवालानुसार, ‘सीन’ने बुधवारी २.६५ कोटी रुपये कमाई केली आहे. भारतात ‘सीन’चे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन १४५.०५ कोटी रुपये झाले आहे.
‘सीन’ची कहाणी काय आहे?
जितु माधवन यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपट ‘सीन’च्या कथेबद्दल सांगायचे झाले तर त्यात सूर्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्याला एक सुटलेले जुने प्रकरण पुन्हा तपासावे लागते. जेव्हा त्याचे एक गुपित चुकून सर्वांसमोर येते, तेव्हा त्याला एका धोकादायक कॉन्ट्रॅक्ट किलरच्या मागे धावावे लागते. चित्रपटात नजरिया नाजिम आणि नसलेन सारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत, ज्यांचा अभिनय कथेत जीव आणतो.
