AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन

मी रोज संसदेत येतो मात्र… गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन

| Updated on: Aug 12, 2026 | 1:08 PM
Share

पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या आंदोलनामुळे संसदेचे कामकाज ठप्प आहे. त्यामुळे सरकारकडून कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेत कामकाज सुरळीत करण्याची विनंती केली.

पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या आंदोलनामुळे संसदेचे कामकाज ठप्प आहे. त्यामुळे सरकारकडून कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेत कामकाज सुरळीत करण्याची विनंती केली. मात्र सीजेपी आंदोलनातील लाठीहल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची विरोधकांकडून मागणी कायम आहे.

अमित शाह यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “मी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास तयार आहे. पण विरोधक चर्चाच होऊ देऊ इच्छित नाही.” तसेच “सरकारकडे लपवण्यासारखं काहीच नाही,” असेही त्यांनी सांगितले.

विरोधकांनी चर्चेसाठी वेळ निश्चित करावा, असे आवाहन शाह यांनी केले. “आज सुद्धा दुपारी 3 वाजेपासून ते उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या चर्चेसाठी आम्ही तयार आहोत,” असे ते म्हणाले. पुढे त्यांनी, “आता जनतेने ठरवावे की चर्चेपासून कोण पळ काढत आहे,” असे सांगितले. संसदेची कोंडी फोडून कामकाज सुरळीत करण्याचे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.

Published on: Aug 12, 2026 01:08 PM

Follow Us