PM Modi : ‘कधीही ‘शॉर्टकट’चा वापर करु नका’, पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Gen-Z अर्थात तरुण पिढीला सोशल मीडियावरील शॉर्टकटपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ‘ट्रिम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

सध्या रिल्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचा तरुणांवर मोठा प्रभाव आहे. मात्र, त्यांच्या मागे न लागता आवडत्या व्यक्तींची आत्मचरित्रे वाचावीत, असे आवाहन मोदींनी केले. आत्मचरित्रांमधून इतिहासातील घटनांसोबत त्या काळातील अनुभवही समजतात, असे त्यांनी सांगितले.
मोदींनी रेल्वे स्थानकावरील एका संदेशाचा संदर्भ देत सांगितलं “A shortcut will cut you short.” असे म्हटले. चुकीच्या शॉर्टकटमुळे नुकसान होऊ शकते, असा त्यांचा इशारा होता. आयुष्यात पुढे जाण्यासाठी दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रामनाथ कोविंद यांच्याशी जुने संबंध असल्याचे सांगत मोदींनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कोविंद यांचा जीवनप्रवास आणि अनुभव नव्या पिढीने त्यांच्या पुस्तकातून जाणून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या संघर्षातून देश आणि लोकशाहीसाठी प्रेरणा मिळते, असे मोदी म्हणाले.
Published on: Aug 12, 2026 01:47 PM
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती