AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओ की एअरटेल, कोणत्या कंपनीचा 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आहे सर्वात स्वस्त

रिलायन्स जिओच्या 30 दिवसांच्या प्लॅनची ​​किंमत 355 रूपये आहे. जी एअरटेलच्या प्लॅनइतकीच आहे. दोन्ही प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि अतिरिक्त लाभांच्या बाबतीत मात्र फरक आहे. चला तर मग या दोन्ही प्लॅनच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊयात.

जिओ की एअरटेल, कोणत्या कंपनीचा 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आहे सर्वात स्वस्त
jio and airtelImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 18, 2026 | 9:38 PM
Share

तुमच्याकडे जर रिलायन्स जिओ किंवा एअरटेलचे प्रीपेड सिम कार्ड असेल, तर पुढच्या वेळी रिचार्ज करण्यापूर्वी कोणती कंपनी 30 दिवसांच्या वैधतेसह सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन देते हे जाणून घ्या. जिओच्या सर्वात स्वस्त 30 दिवसांच्या प्लॅनची ​​किंमत 355 रूपये आहे आणि त्यात डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि अतिरिक्त लाभांचा समावेश आहे. दुसरीकडे, एअरटेलच्या सर्वात स्वस्त 30 दिवसांच्या प्लॅनची ​​किंमत देखील 355 रूपये आहे. या दोन्ही टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्लॅनमध्ये वेगवेगळ्या अतिरिक्त सुविधा देत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात.

जिओचा 355 रूपयांच्या प्लॅनची माहिती

तुम्ही जर 355 रूपयांचा रिचार्ज केल्यावर रिलायन्स जिओ तुम्हाला एकूण 25 जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचे फायदे मिळतात. इतकेच नाही, तर कंपनी या प्लॅनसोबत तीन महिन्यांचे जिओ हॉटस्टार मोबाईल, मोफत जिओ क्लाउड स्टोरेज, 18 महिन्यांचा गूगल जेमिनी प्रो प्लॅन, 5000 जीबी क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनाना बेनिफिट यांसारखे अतिरिक्त फायदेही देते. या प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची आहे.

एअरटेलचे 355 रूपयांच्या प्लॅनचे फायदे

या एअरटेल प्रीपेड प्लॅनसोबत कंपनी तुम्हाला एकूण 25 जीबी हाय-स्पीड डेटा, 300 एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचे फायदे देईल. 30 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये 5 रूपये किमतीचा टॉकटाइम देखील मिळतो. या प्लॅनमध्ये 4 हजार किमतीचे ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम (12 महिन्यांची वैधता), रिअल-टाइम स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट्स, आणि दर 30 दिवसांनी एकदा एक मोफत हॅलोट्यून यांसारखे अतिरिक्त फायदे देखील मिळतात.

फरक: दोन्ही प्लॅन्समधील फरकांबद्दल बोलायचे झाल्यास, सर्वात मोठा फरक एसएमएसमध्ये आहे. जिओ दररोज एसएमएस देते, तर एअरटेल एकूण 300 एसएमएस देते. शिवाय जिओ टॉकटाइम देत नाही, तर एअरटेल देते. तुम्हाला दोन्ही प्लॅन्सच्या अतिरिक्त लाभांमध्येही फरक जाणवेल. आता, तुमच्यासाठी कोणते लाभ सर्वात महत्त्वाचे आहेत हे ठरवणे तुमच्यावर अवलंबून आहे.

Follow Us
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर..
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर थेट...
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? अमित शाह देणार उत्तर!
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? विद्यार्थी आंदोलनावर चर्चा, अमित शाह देणार उत्तर!
मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
Pratap Sarnaik | मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक?
MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं
चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर....
Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा..
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या?
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर